Maharashtra Politics: 'तुम्ही जामिनावर आहात, आक्रमक व्हा...', भास्कर जाधवांचा भुजबळांबाबद खळबळजनक दावा

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी गोंदिया येथे खळबळजनक विधान केलं आहे. छगन भुजबळ यांना भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलवून, तुम्ही जामिनावर आहात, आक्रमक व्हा असं सांगितलं.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी गोंदिया येथे खळबळजनक विधान केलं आहे. छगन भुजबळ यांना भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलवून, तुम्ही जामिनावर आहात, आक्रमक व्हा असं सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले असे वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे. आमदार भास्कर जाधव हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांना गोंदियाच्या आरोग्य व्यवस्था संदर्भात विचारणा केली असता, या सरकारचे दुसऱ्याचे पक्ष फोडण्याकडे जास्त लक्ष असून महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याकडे लक्ष नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारचं आरोग्य जनतेने पार बिघडवू टाकावं, असं आवाहन देखील आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे.

गोंदियाच्या जागेवर दावा

2024 च्या निवडणुका जवळ आल्याआहेत. प्रत्येक पक्षाने आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. अशातच गोंदिया विधानसभा मतदारसंघावर आमदार भास्कर जाधव यांनी दावा केला असून 2024 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना आपला उमेदवार लढवेल असा दावाही त्यांनी आज गोंदियामध्ये केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Maharashtra Politics: हा मोर्चा धारावीकरांचा नाही, तर.... , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

भास्कर जाधव यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांचे कार्यकर्ते भूमिपूजन करतात असा आरोप उदय सामंत यांनी केला होता. त्यावर भास्कर जाधव यांना विचारले असता, माझ्या मतदारसंघांमध्ये जी मंजूर झालेली कामे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारमधली आहेत. त्या काळातली मंजूर कामांवर या नियमबाह्य आणि विश्वासघाती सरकारने स्टे आणला होता. मी हाय कोर्टामध्ये जाऊन सर्व आमदारांच्या कामांमध्ये स्टे उठविला. उदय सामंत मंत्री झाले म्हणून त्यांना काही अभ्यास आहे, असं नाही. ते जर असे बोलले असतील मी त्यांच्या समाचार घेईन सोडणार नाही. असे वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केले.

Maharashtra Politics
Ethanol Production: ..म्हणून केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com