अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. जो बायडन यांच्या ताफ्याला एक भरधाव कार धडकल्याची घटना घडली आहे. या जो बायडन आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना कारने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. (Latest News)
एका चौकातून पुढे जात असताना एका फोर्ड कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट बायडन यांच्या ताफ्यातील वाहनाला धडकली. त्यानंतर जो बायडन यांच्या सुरक्षारक्षकांनी कारला घेरलं आणि चालकाला ताब्यात घेतलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष बायडन यांना सुरक्षारक्षकांना तातडीने घटनास्थळावरुन हलवलं. यावेळी ते वाहनाच्या दिशेने धावताना दिसले. त्यांच्या पत्नी या आधीच कारमध्ये बसलेल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र सध्या या घटनेबाबत गुप्तचर यंत्रणेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.