Santacruz News: सांताक्रुज पोलीस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम; वृद्धाश्रमातील वृध्दांना घडवली समुद्र सफर

Juhu Chaupati: सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने आश्रमातील वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांना स्पीड बोटने समुद्र सफर घडवून आणली.
Santacruz News
Santacruz NewsSaam TV
Published On

संजय गडदे

Santacruz News:

अनेकांनी समुद्र हा केवळ चित्रपट किंवा टीव्हीवरील मालिकांमध्येच पाहिलेला असतो. आयुष्यभर खडतर जीवन जगणाऱ्या किंवा आश्रमात आश्रयास असलेल्या नागरिकांच्या नशिबी मात्र समुद्र सफर क्वचित प्रसंगी अनुभवयाला येते. अशात सांताक्रुज पोलीस वृद्ध नागरिकांच्या आनंदासाठी त्यांना जुहू चौपाटीवर घेऊन गेलेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Santacruz News
Andheri Crime News: कस्टम अधिकारी असल्याचं सांगत ९ कोटी रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू

आश्रमात आश्रयास असलेल्या 30 वृद्धांना आणि 40 शालेय विद्यार्थ्यांना मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर फिरण्याचा आणि समुद्र सफारीचा आनंद घेण्याचा योग पोलिसांनी घडवून आणला. सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने आश्रमातील वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांना स्पीड बोटने समुद्र सफर घडवून आणली.

यावेळी आश्रमातील वृद्ध नागरिकांचा वाढदिवस देखील सर्वांच्या उपस्थितीत केककापून साजरा करण्यात आला. यावेळी सांताक्रुज पोलीस ठाण्याकडून या पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी देखील उपलब्ध करून दिल्या होत्या.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजाचे किंवा माणुस्कीचे देणे लागतो या विचाराने दान किंवा मदत केली पाहिजे. सढळ हाताने मदत करणाऱ्या व्यक्ती सध्याच्या युगात फार कमी आहेत. वृद्धांचा घरात त्रास होतो असं सांगून अनेक जण त्यांना आश्रमात दाखल करतात. मात्र पोलिसांनी वद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी केलेल्या कार्याने तरुणांनी प्रेरीत होऊन अशी कामे केली पाहिजेत.

Santacruz News
Andheri Crime News: कस्टम अधिकारी असल्याचं सांगत ९ कोटी रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com