Pune Crime News: बहिणीला त्रास देणाऱ्या भावजीची मित्रांच्या मदतीने हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News: बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून तरुणाला राग अनावर झाला. त्याने मित्राच्या मदतीने भावजीची हत्या केली.
Pune Latest Marathi News
Pune Latest Marathi News Saam TV
Published On

Pune Latest Marathi News

बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून १९ वर्षीय तरुणाला राग अनावर झाला. त्याने मित्राच्या मदतीने भावजीची हत्या केली. ही धक्कादायक घटना पुणे शहरातील बालेवाडी परिसरातील पाटील वस्तीत घडली. खूनानंतर आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Latest Marathi News
Terrorist Attack: दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर कसा केला हल्ला? जखमी सैनिकाने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

राजेंद्र कुमार कांबळे (वय २४, रा. बालेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Police) बाब्या व राहुल रिकामे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजेंद्र हा बिगारी काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच तो पुण्यात (Pune News) आला होता. बालेवाडी येथील पाटील वस्तीत तो भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान, मृत राजेंद्र हा पत्नीला मानसिक त्रास द्यायचा इतकंच नाही, तर तिला मारहाण देखील करायचा.

पती सतत मला मारहाण करतो, अशी तक्रार बहिणीने आरोपी भावाकडे केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी भावाने बुधवारी रात्री बहिणीचं घर गाठलं. तिथे मित्राच्या मदतीने त्याने भाऊजीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत राजेंद्रचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु केला आहे.

Pune Latest Marathi News
LPG Cylinder Price: खुशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त; भाव 'इतक्या' रुपयांनी घसरले, वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com