Adani Share: हिंडनबर्गच्या आरोपानंतर शेअर मार्केट कोसळलं; तरीही अदानी समूहाच्या 'या' दोन शेअर्सचा बोलबाला

Adani Shares After Hindenburg Report : हिंडनबर्गच्या आरोपानंतर शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाचे शेअर्स ढामपणे खाली आपटतील असं वाटतं होतं. शेअर्स मार्केटच्या सुरुवातीला कंपनीचे सर्व शेअर्समध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली होती. परंतु काही वेळानंतर या शेअर्समध्ये तेजी दिसली.
Adani Share: हिंडनबर्गच्या आरोपानंतर 
 शेअर मार्केट कोसळलं; तरीही अदानी समूहाच्या  'या' दोन शेअर्सचा बोलबाला
Adani Shares After Hindenburg Report
Published On

हिंडेनबर्गने शनिवारी अदानी समूहावर गंभीर आरोप करणारा अहवाल जाहीर केला होता. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात बरीच अस्थिरता होती. बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार पाहायला मिळाली. धोक्याच्या लाल चिन्हावर मार्केट सुरू झाल्यानंतर तासाभरातच सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार गती घेतली. यात अदानी समुहाचे देखील शेअर्स होते. हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर्सवर फारसा परिणाम झाला नाही. अदानी समुहातील दोन कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीला घसरले होते, त्यानंतर सावरत ते ग्रीन झोनमध्ये आले. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या १० कंपन्या शेअर्स बाजारमध्ये सूचीबद्ध आहेत.

सुरुवातीला हे सर्व १० शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. ज्यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टीने पलटी मारली त्यावेळी अदानी शेअर्सनेही चाल बदलली. अदानी ग्रीन एनर्जी शेअर सुरुवातीच्या व्यापारात ४ टक्क्यांहून अधिक घसरला होता, परंतु दुपारी २ च्या सुमारास तो अचानक ग्रीन झोनमध्ये आला आणि १६६७.५० रुपयांपर्यंत घसरल्यानंतर तो १८१५ रुपयांपर्यंत पोहचला. अदानी ग्रीनसोबतच गौतम अदानी यांच्या सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटचे शेअर्सही रेड झोनमधून बाहेर पडत आणि सेन्सेक्स-निफ्टीच्या बरोबरीने ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले.

अंबुजा सिमेंटचा शेअर १.२० टक्क्यांच्या वाढीसह ६४१ रुपयांच्या स्थरावर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये हा शेअर्स ६१७.७५ रुपयांच्या स्तरापर्यंत खाली आला होता.

अदानींच्या इतर शेअर्सची स्थिती काय?

Adani Group अदानी ग्रुपचे इतर कंपन्याचे शेअर्स Adani Ent Share (-1.40%), Adani Power Share (-0.49%), Adani Total Gas (-3.75%), Adani Wilmar (-2.56%), Adani Energy Solutions (-3.33%), Adani Port Share (-1.32%), ACC Ltd Share (-0.97%) और NDTV Share (-2.60%) खाली घसरले होते.

स्टॉक मार्कटमध्ये सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स ३०० अंकांनी पेक्षा जास्त अंकांनी खाली घसरला होता. या घसरणीसह ७९,३३०.१२ च्या स्थरावरून व्यवहार सुरू केला होता. शनिवारी जाहीर झालेल्या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येईल अशी अपेक्षा होती,त्यानुसार बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारातही तेच दिसून आले.

Adani Share: हिंडनबर्गच्या आरोपानंतर 
 शेअर मार्केट कोसळलं; तरीही अदानी समूहाच्या  'या' दोन शेअर्सचा बोलबाला
Invsement Tips: फक्त १ हजार रुपयांमध्ये व्हा लखपती; गुंतवणूकदारांना SIP करेल मालामाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com