Share Market News : हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठा भूकंप; अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले

Stock market news : हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. या रिपोर्टनंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी अदानी समुहाचे शेअर्स धडाधड कोसळले.
हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठा भूकंप; अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले
Share Market Saam Tv
Published On

नवी दिल्ली : हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंर शेअर बाजारात भूकंप आला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजारातील काही शेअर्स धडाधडल कोसळले. अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याचे दिसून आले. अदानी विल्मर, अदानी एनर्जी सॉल्यूशनसहित इतर अनेक शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला.

हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. अदानी विल्मरचे शेअर ६ टक्क्यांनी घसरला आहे. तर अदानी ग्रुपचा बेंचमार्क अदानी एंटरप्राइजेजमध्येही ३.१७ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे. अदानी टोटल गॅस ७ टक्क्यांनी घसरला आहे. एसीसीमध्ये १.८३ टक्के आणि अंबुजा सिमेंटचा शेअर्स १.५४ टक्क्यांनी घसरला. तर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ३.६१ टक्क्यांनी कोसळला.

हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठा भूकंप; अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले
Share Market : केंद्रात राजकीय स्थैर्य; सेन्सेक्सचा सर्वकालिक उच्चांक

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.३० वाजताच्या व्यवहारात सेन्सेक्स २२९ अंकानी घसरल्याने ७९४७६ वर पोहोचला. निफ्टी देखील ९१ अंकानी घसरून २४,२७६ वर पोहोचला. निफ्टी टॉप लुजरमध्ये अदानी एंटरप्राइजेजचे शेअर्स २.६५ टक्क्यांनी घसरून ३१०२.९५ रुपयवांवर होता. एनटीपीचा शेअर्सही १.९२ टक्क्यांनी घसरला. तर अदानी पोर्ट्सचा शेअर्स १.८१ टक्क्यांनी घसरून १५०६ रुपयांवर आला.

दरम्यान, हिंडनबर्ग रिपोर्टने अदानी शेअर्सला घेरल्यानंतर आता थेट शेअर बाजार नियामक संस्था सेबीला घेरलं आहे. हिंडनबर्ग रिपोर्टमधून सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर हिंडनबर्गवर आरोप करत सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांनी भारतातील अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत हिंडनबर्गलाच कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. कंपनीनेही सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्लाबोल केला आहे. सेबीनेही निवेदन जाहीर करत आरोप फेटाळले आहेत.

हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठा भूकंप; अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले
Business Idea: फक्त 50,000 मध्ये सुरू करू शकता 'हे' 7 व्यवसाय, कमाई होईल शानदार

अदानी ग्रुप आणि सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्या स्पष्टीकरणानंतरही शेअर बाजार कोसळलं. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर शेअर बाजारावर परिणाम होणार असल्याची चर्चा होती. मार्केट एक्सपर्ट्सच्या रिपोर्टनुसार, हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये या आधी देखील आरोप करण्यात आले होते. याबाबत गुंतवणूकारांना आधीच माहिती ठाऊक होती. या आरोपांचा तपास देखील सुरु झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com