Bharat Jadhav
तुम्हाला तुमच्या नोकरीचा कंटाळा आला असेल आणि कमी बजेटमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 7 उत्तम व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहोत.
जर तुम्ही फूड स्टॉल उभारण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सुरुवातीच्या मेनूमध्ये नूडल्स, मोमोज, चाट आणि इतर स्वादिष्ट स्ट्रीट फूड सर्व्ह करून तुम्ही चांगली सुरुवात करू शकता.
तुम्ही शिक्षित असाल आणि नोकरी मिळवू शकत नसाल तर तुम्ही शिकवणी म्हणजेच ट्यूशन चालू करू शकतात. या व्यवसायात जास्त गुंतवणूक करावी लागत नाही.
लोणच्याचा व्यवसाय सदाबहार आहे. तुम्ही घरी लोणचे बनवू शकता आणि ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकू शकता.
मध्यमवर्गीय लोकांना बजेटनुसार लग्न, वाढदिवस पार्टीमध्ये डेकोरेशन करायला आवडते. यामुळे तुम्ही कमी गुंतवणुकीत फोटोग्राफी आणि सजावटीचे काम करू शकता.
सोशल मीडियाच्या युगात, YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर बनणं सामान्य झाले आहे. तुमच्याकडे काही कौशल्य असेल तर ते दाखवून तुम्ही त्यावरुन चांगले उत्पन्न मिळवू शकता.
जर तुम्हाला फॅशन सेन्सची असेल तर तुम्ही स्वतःचे बुटीक उघडू शकता. तुम्ही 50,000 रुपयांमध्ये इन्व्हेंटरी मिळवू शकता आणि घरबसल्या बुटीक सुरू करू शकता.
आजकाल स्वयंपाकाची आवड असलेल्या लोकांनी घरोघरी क्लाउड किचन सुरू केले आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला किमान गुंतवणूक करावी लागेल. व्यवसायासाठी लागणारे साहित्य 50 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
येथे क्लिक करा