Share Market Crash Saam Tv
बिझनेस

Share Market Crash : सर्वात मोठी घसरण, शेअर मार्केटमध्ये काही सेकंदात १२ लाख कोटी बुडाले;रूपयाही घसरला अन् क्रूड ऑइलही महागले

Share Market Crash Today: आज सकाळी शेअर मार्केट उघडताच गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल घसरले होते. याचसोबत रुपयाची किंमतदेखील कमी झाली आहे.

Siddhi Hande

इराण-इस्त्रायल युद्धाचा भारतावर परिणाम

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

शेअर मार्केट कोसळळे

रुपयाची किंमत घसरली

जागतिक पातळीवर सुरु असलेल्या इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम देशावर होताना दिसत आहे. इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्धामुळे रुपयाची किंमत घसरली, शेअर मार्केट कोसळले आहे तर कच्च्या तेलाच्या किंमतीदेखील वाढताना दिसत आहे. यामुळे इराण-इस्त्रायल युद्धाचा गंभीर परिणाम भारतावर होत असल्याचे दिसत आहे. या युद्धाचा भारतालादेखील फटका बसत आहे. व्यापारासाठी सुरु असलेली काही सागरी वाहतूक सध्या बंद आहे. परिणामी अनेक गोष्टी आयात होत नाही.

रुपयाची किंमत घसरली (Rupee Price Down)

जागतिक पातळीवरच्या युद्धाचा परिणाम थेट रुपयावर झाला आहे. रुपयाची किंमत अजून कमी झाली आहे. दिवसेंदिवस रुपयाची किंमत घसरत आहे आणि डॉलरची किंमत वाढत आहे. रुपयाची किंमत ९२.२० डॉलर प्रति डॉलरवर आली आहे. रुपयाची किंमत घसरल्याने भारताला फटका बसला आहे. भविष्यात रुपयाची किंमत ९३ डॉलर होण्याचीही शक्यता आहे.

शेअर मार्केट कोसळले (Share Market Crash Today)

जेव्हापासून युद्ध सुरु आहे तेव्हापासून शेअर मार्केट कोसळताना दिसत आहे. आज सकाळी शेअर मार्केटची सुरुवात लाल रंगासह झाली. बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स २४०० पेक्षा जास्त अंकानी घसरला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजची निफ्टी ७०० अंकांनी घसरली आहे.

सेन्सेक्स सकाळी ७६,४२४ रुपयांवर व्यव्हार करत होते. तर निफ्टी २३,८६८ वर ओपन झाला होता. यामुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले आहे. गुंतवणूकदारांचे अवघ्या काही मिनिटात जवळपास १२ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या (Crude Oil Price Hike)

इराण-युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. आज कच्च्या तेलाचे दर ११७ डॉलर प्रति बॅरलवर आहेत. आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भविष्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलवर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT