Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या, पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडणार, धक्कादायक कारण आले समोर

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. इराण-इस्त्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम जगभरात होणार आहे.
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel PriceSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेल महागणार

इराण-इस्त्रायल युद्धामुळे परिणाम

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

जगात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. इराण-इस्त्रायलच्या युद्धाचा परिणाम इतर देशांवरदेखील होणार आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे देवाणघेवाणीसाठी अनेक अडचणी येणार आहे.

Petrol-Diesel Price
Petrol Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता

होर्मुझची सामुद्रधुनी ही सर्वात महत्त्वाची आहे. मात्र, सुरक्षेमुळे ही सामुद्रध्वनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समुद्राद्वारे होणाऱ्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे थेट पेट्रोल-डिझेलदेखील वाढण्याची शक्यता आहे.

इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगावर संकट निर्माण झाले आहे. इंधनाच्या किंमती वाढू शकतात. कच्च्या तेलाच्या किंमती काल ७२ डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या. गेल्या आठवड्याभरातील ही सर्वाधिक वाढ आहे. २०२६ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यातच १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Petrol-Diesel Price
Ethanol Petrol: इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी? इथेनॉलमुळे पेट्रोलची गुणवत्ता घसरली?

आता दोन दिवसात कच्च्या तेलाच्या किंमतीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा दर ८० डॉलरवर पोहचला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यावर थेट इंधनाचे दर वाढतात. यामुळे जगभरात हे पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता आहे.

अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटमध्येही ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे दर ७० डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. कच्च्या तेलाचे दर या युद्धामुळे अजून वाढण्याची शक्यता आहे.इराण हा इंधन उत्पादन करणारा चौथा मोठा देश आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली इंधन उत्पादनात इराणचा वाट १२ टक्के आहे. इराणमध्ये दर दिवशी ३.३ मिलियन बॅरल तेल काढले जाऊ शकते. यामुळेच संपूर्ण जगाला फटका बसण्याची शक्यता आहे.

Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Price: 'तो' एक निर्णय सर्वसामान्यांना 'महागा'त पडणार,पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com