Petrol Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता

Petrol Diesel Price will Decrease: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलचे दर घसरणार

कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या

भारताने रुसमधून कच्चे तेल खरेदी करण्यात कपात केली

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांना खुशखबर मिळू शकते.

Petrol Diesel Price
Petrol Price: पेट्रोल डिझेलवर टॅक्स नसेल तर १ लिटरची किंमत किती? वाचा सविस्तर

कच्च्या तेलाच्या दरात मोठी घट झाली. सध्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६४ डॉलर्सवर आले आहे. हे दर १६ आठवड्यांमध्ये पहिल्यांदा एवढे कमी झाले होते.टॅरिफ आणि अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर घसरल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय भारत रशियाकडून आणखी स्वस्तात तेल खरेदी करत आहे. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये देशात पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून 6.05 लाख bpd तेल आयात केले.हे ऑगस्टच्या तुलने ३२ टक्के कमी आहे.यामुळे रुसमधील कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. अमेरिकेने लावलेला टॅरिफ आणि दबावामुळे ही आयात कमी झाली आहे. दरम्यान, यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.

Petrol Diesel Price
Gold Rate Today: खुशखबर! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

सध्या कच्च्या तेल प्रति बॅरल ६४ डॉलरवर आहेत.मागच्या वर्षी ७ ऑक्टोबरला कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८१ डॉलर होते.यानंतर यावर्षी हे दर खूप घसरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीदेखील कमी होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेट्रोलचे दर अवलंबून असतात. जर कच्च्या तेलाचे दर घसरले की आपोआप इंधनाच्या दरात कपात होते.

Petrol Diesel Price
Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com