Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Retirement Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम (SCSS) ही सरकारी मान्यताप्राप्त योजना आहे. 8.2% व्याजदरावर 5 वर्षांत 12 लाख रुपयांहून अधिक कमाईची खात्री देते.
Senior citizen savings scheme
Post Office Schemegoogle
Published On

अनेकांना भविष्यात मोठा परतावा मिळेल अशी योजना निवडताना गोंधळायला होते. मात्र आम्ही तुमच्यासाठी कमी कालावधीत सगळ्यात जास्त परतावा मिळवून देणारी खास योजना आणली आहे. कल्पना करा, तुम्ही अशी एखादी योजना निवडली आहे ज्यामध्ये फक्त व्याजाच्या माध्यमातून पाच वर्षांत तब्बल 12 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते. हे केवळ स्वप्न नाही तर सत्य आहे. पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम (SCSS) यात गुंतवणूक करून तुम्ही हा फायदा घेऊ शकता.

सध्या या योजनेत 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा आहे. त्यावर वार्षिक 8.2% व्याजदर मिळतं. याचा अर्थ असा की दर महिन्याला अंदाजे 20,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. म्हणजेच वर्षभरात जवळपास 2.46 लाख रुपयांचे व्याज आणि पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 12 लाख 30 हजार रुपयांची कमाई यामध्ये होते.

Senior citizen savings scheme
Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

साध्या बँक एफडीमध्ये जिथे फक्त 6 ते 7 टक्के व्याजदर मिळतं, तिथे SCSS मध्ये 8.2 टक्के व्याज मिळते आणि तेही सरकारीच्या परवानगीने. म्हणजेच या योजनेत ना कोणताही रिस्क आहे, ना बाजारातील चढ-उताराची भीती. रिटायर्डनंतर ठरावीक उत्पन्न मिळवायचे असेल तर ज्येष्ठांसाठी ही योजना सगळ्यात फायदेशीर ठरणार आहे. पूर्वी या योजनेत फक्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करण्याची परवानगी होती. पण सरकारने ती दुप्पट करून 30 लाखांवर नेली आहे.

त्यामुळे रिटायर्ड नागरिकांना अधिक लाभ मिळणार आहे. जर पती-पत्नी दोघांनी मिळून खाते उघडले तर त्यांना दुहेरी फायदा घेता येतो. या योजनेची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात गुंतवलेला मूळ भांडवल सरकारकडून पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. त्यासोबतच व्याजदेखील वेळेवर मिळतं. 5 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर इच्छेनुसार ही योजना पुढे वाढवता येते. म्हणजेच ठरावीक रक्कम तुमच्या खात्यात जमा होत राहते.

Senior citizen savings scheme
Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com