Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Body Pain Risk: अंगदुखी ही केवळ थकवा नाही तर कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. सततची, औषधांनी न जाणारी वेदना दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Body Pain Cancer Risk
Cancer Riskgoogle
Published On

अंगदुखी ही फक्त थकव्यामुळेच नाहीतर कॅन्सरमुळे सुद्धा होऊ शकते. बऱ्याच जणांचा असा समज आहे की, जर तुमचे अंग कोणत्याही कारणाशिवाय दुखत असेल तर तुम्हाला या समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शरीरात होणाऱ्या अनेक वेदना या ताणतणावामुळेच आल्याचा समज दूर करणे महत्वाचे आहे. त्यामुळे नेहमीची आणि सतत जाणवणारी वेदना यामधला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

जर पाठ, पोट, डोकं, हाडं किंवा छातीमध्ये कारण नसताना दुखणे सुरू झाले आणि रात्री झोपमोड करणारी वेदना जाणवत असेल, तर ती नक्कीच दुर्लक्षित करू नये. तज्ज्ञांच्या मते, अशा वेदनेसोबत वजन कमी होणं, थकवा किंवा भूक न लागणं अशी लक्षणं दिसत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण शरीरातील ही वेदना हा इशारा असू शकतो की एखादी गंभीर समस्या सुरू झाली आहे.

Body Pain Cancer Risk
Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

साधारणपणे ८० टक्के लोकांना पाठदुखीचा दुखण्याला सतत सामोरं जावं लागतं. चुकीच्या पोश्चरमुळे किंवा लॅपटॉपवर खूप वेळ काम केल्यामुळे हे दुखणे जाणवते. विश्रांती किंवा औषधानेही न बरी होणारी तीव्र आणि सततची पाठदुखी कधी कधी पॅनक्रियाटिक, ब्रेस्ट, फुफ्फुस, प्रोस्टेट किंवा किडनी कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे पोटदुखी, गॅस किंवा फुगलेपणा हे साधं वाटत असलं तरी सततचं पोट हे ओव्हेरियन, कोलन किंवा लिव्हर कॅन्सरचे संकेत असू शकतात.

डोकेदुखी हीसुद्धा सगळ्यांची तक्रार आहे. पण नेहमीच्या औषधांनी न जाणारी, सततची किंवा नवी डोकेदुखी ही ब्रेन ट्युमरचं लक्षण ठरू शकते. अशा वेळी वेदना विशेषतः सकाळी किंवा झोपल्यावर अधिक जाणवते. हाडे किंवा सांध्यांमध्ये जाणवणारी खोल, टोचणारी वेदना जी रात्री वाढते आणि हालचालींनी कमी होत नाही, तीही कॅन्सरशी संबंधित असू शकते. तसेच, छातीतील वेदना अनेकदा हृदयविकाराशी जोडली जाते. पण हृदय तपासणीत काही न आढळल्यास, ही वेदना फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

Body Pain Cancer Risk
Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com