Share Market Crash: अर्थसंकल्पामधील 'ती' एक घोषणा अन् शेअर बाजार धडामकन कोसळला, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असताना भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स २५०० अंकांपेक्षा जास्त आणि निफ्टी ७०० अंकांनी घसरला आहे. त्यामुळे भांडवली बाजारात घबराट पसरली आहे.
Share Market Crash: अर्थसंकल्पामधील 'ती' एक घोषणा अन् शेअर बाजार धडामकन कोसळला, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
Published On

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाच्या अर्थसंकल्प सादर करत आहे, मात्र त्यावेळी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झालीय. वृत्त लिहिलेपर्यंत सेन्सेक्स २५०० अकांच्या खाली आला होता. तर निफ्टी ७०० अंकांनी घसरत आहे. भांडवली क्षेत्रात मोठी घसरण झाली असून बीएसई आणि ग्रोव सारख्या शेअर्समध्ये मंदी दिसून येत आहे. वेदांत, हिंदुस्तान झिंक आणि हिंदुस्तान कॉपरमध्येही लक्षणीय घसरण दिसून येत आहे. निफ्टी २४,८०० च्या खाली व्यवहार करत आहे, तर सेन्सेक्स ८०,५०० च्या खाली व्यवहार करत आहे.

Share Market Crash: अर्थसंकल्पामधील 'ती' एक घोषणा अन् शेअर बाजार धडामकन कोसळला, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
Cigarette Price Hike: सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किंमतीत वाढ! एका सिगारेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

बीएसईच्या टॉप ३० च्या शेअर्समधील फक्त ३ शेअर्समध्ये तेजी आहे. तर २७ शेअर्समध्ये मोठी घसरण झालीय. सनफार्मा, टीसीएस आणि कोटक महिंद्रा यांना सोडून बाकी सर्व शेअर्समध्ये ८ टक्के घसरण झालीय. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी, बँक सेक्टरसह सर्व क्षेत्रात पडझड झाल्याचं दिसत आहे. पीएसयू बँकेच्या सेक्टर्समध्येही दबाव वाढलाय.

शेअर्स मार्केटमधील या मोठ्या पडझडीमुळे देशातील गुंतवणूकदारांचे १० लाख रुपये बुडाले आहेत. अर्थसंकल्पात एसटीटीमध्ये वाढ आणि शेअर बायबॅकवर कर लादण्याची घोषणा झाल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

Share Market Crash: अर्थसंकल्पामधील 'ती' एक घोषणा अन् शेअर बाजार धडामकन कोसळला, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
New Income Tax Act: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा! नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून लागू

एसटीटी म्हणजे काय?

अर्थसंकल्प सादर केला जात असल्याने रविवारी शेअर बाजार चालू करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या नुकसानीतून शेअर बाजार सावरेल अशी जनतेची आशा होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर मार्केटमधील असेट खरेदी-विक्रीवर कर आकरण्याची घोषणा केल्यानं शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजारात कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर व्यवहार कर आकारला जातो, ज्याला एसटीटी म्हणतात. गेल्या वेळीही एसटीटी वाढवण्यात आला होता, तर पुन्हा एकदा एसटीटी वाढवण्यात आलीय. यावेळी, F&O मध्ये कोणत्याही प्रीमियमच्या खरेदी आणि विक्रीसाठी STT वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com