शांतनु नायडूने शेअर केली पोस्ट
गर्लफ्रेंडसोबतचे फोटो केले शेअर
कोण आहे शांतनुची गर्लफ्रेंड
दिवंगत उद्योगपती रतन टाटा हे आज आपल्यात नसले तरीही त्यांचे विचार नेहमी आपल्यासोबत असणार आहेत. रतन टाटा हे त्यांच्या माणुसकीमुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांनी अनेक माणसांना जोडून ठेवले. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे शांतनु नायडू. शांतनु नायडू यांची ओळख रतन टाटा यांचा विश्वासू सहकारी म्हणून आहे. शांतनु नायडूने नुकतेच सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंनी चर्चांना उधाण आलं आहे. (Shantanu Naidu Girlfriend)
शांतनु नायडूने गर्लफ्रेंडसोबतचे फोटो केले शेअर
शांतनु नायडूने (Shantanu Naidiu Share Post Of Girlfriend) पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये त्याच्यासोबत एक तरुणी दिसत आहे. ही तरुणी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे अनेकांनी म्हटलेलं आहे. यामधील एका फोटोवर त्यांनी ''Our souls didn't meet, they remembered''असं कॅप्शनदेखील दिले आहे. दरम्यान, या फोटोंवरुन शांतनुने आपल्या नात्याची कबुली दिल्याचे दिसत आहे. शांतनुच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, शांतनुसोबतची ही तरुणी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शांतनुच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शांतनुची गर्लफ्रेंड कोण आहे? काय करते? कुठे राहते? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले आहे. मात्र, शांतनुने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
शांतनु नायडू आहे तरी कोण? (Who is Shantanu Naidu)
शांतनु नायडूला रतन टाटा यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जायचा. शांतनु नायडू हा उत्तम उद्योजक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याने भटक्या कुत्र्यांसाठी एक बेल्ट बनवला होता. जेणेकरुन रस्त्यावरुन फिरणाऱ्या कुत्र्यांचे संरक्षण होईल. याचमुळे शांतनु आणि रतन टाटा यांची भेट झाली होती. त्यानंतर त्याने रतन टाटा यांच्यासोबत जनरल मॅनेजर म्हणून काम केले. याचसोबत तो त्यांचा चांगला मित्रदेखील झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.