Ratan Tata : रतन टाटांच्या इन्टरव्ह्यूतील एकेक शब्द हृदयाला स्पर्श करणारा! आयुष्यातील आनंदी आठवण सोशलवर होतेय व्हायरल

Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या मुलाखती, त्याचे फोटो, त्यांचे विचार, त्यांनी सांगितलेले किस्से यासर्व गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यांची एक खूपच सुंदर मुलाखत होती ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील आनंचा क्षण शेअर केला होता.
Ratan Tata : रतन टाटांच्या इन्टरव्ह्यूतील एकेक शब्द हृदयाला स्पर्श करणारा! आयुष्यातील आनंदी आठवण सोशलवर होतेय व्हायरल
Ratan Tata Google
Published On

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. रतन टाटा यांनी बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अजूनही अनेकांना रतन टाटा आपल्यात राहिले नाहीत यावर विश्वास बसत नाहीये. रतन टाटा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे.

रतन टाटा यांच्या जुन्या मुलाखती, त्याचे फोटो, त्यांचे विचार, त्यांनी सांगितलेले किस्से यासर्व गोष्टी व्हायरल होत आहेत. अशामध्येच रतन टाटा यांची एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोनिक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांना आयुष्यामध्ये सर्वात आनंदी कधी वाटले? हा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना त्यांनी आयुष्यातील एक जबरदस्त किस्सा सांगितला. जो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

रतन टाटा यांना या मुलाखतीमध्ये 'सर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त आनंद कधी झाला? ती आठवण सांगाल का?' हा प्रश्न विचारला. या प्रश्नाला रतन टाटा यांनी अगदी मनाला भिडेल असे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. मला खरा आनंद मिळाला जेव्हा मी मोठा आणि समजूतदार झालो. मी लहान असताना मी महागडी कपडे आणि गाड्यांमध्ये आनंद शोधत होतो.

रतन टाटा यांनी या मुलाखतीमध्ये आयुष्यातील आनंदाचे चार टप्पे सांगितले. त्यामधील आनंदाचा पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही असे त्यांनी सांगितले होते. दुसरा टप्पा मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा होता. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आनंदाचा तिसरा टप्पा सांगितला. ते म्हणाले की, तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील ९५ टक्के डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

Ratan Tata : रतन टाटांच्या इन्टरव्ह्यूतील एकेक शब्द हृदयाला स्पर्श करणारा! आयुष्यातील आनंदी आठवण सोशलवर होतेय व्हायरल
Ratan Tata Funeral : उद्योग'रत्न' टाटांना अखेरचा निरोप; वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

आनंदाच्या चौथा टप्प्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, जेव्हा मला माझ्या एका मित्राने काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले होते. जवळपास २०० मुलं होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर खरेदी केल्या. पण मित्राने आग्रह धरला होता की मी त्याच्यासोबत जाऊन या मुलांना स्वत:च्या हाताने या व्हील चेअर द्याव्यात. मित्राच्या विनंतीवरून मी त्यांच्यासोबत गेलो. या मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. त्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद दिसला त्यामुळे माझ्या आयुष्यात एक नवीन अनुभूती आली.

मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो. जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती. जणू तो काही कसला तरी विजयोत्सवच होता. त्या दिवशी मला माझ्या आतमध्ये खरा आनंद जाणवला. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून मी परत जायला तयार होत असताना एका लहान मुलाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलाने माझा पाय सोडला नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय आणखी घट्ट धरले. मी त्या मुलाला विचारले 'तुला आणखी काही पाहिजे का?'

तर त्या मुलाने मला जे उत्तर दिले त्याने मला धक्काच बसला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला. त्या मुलाने सांगितले की, 'मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.' दरम्यान, या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी सांगितलेला हा किस्सा वाचून आता त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. त्यांची ही मुलाखत सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

Ratan Tata : रतन टाटांच्या इन्टरव्ह्यूतील एकेक शब्द हृदयाला स्पर्श करणारा! आयुष्यातील आनंदी आठवण सोशलवर होतेय व्हायरल
Ratan Tata : श्वान आजारी पडलं, टाटांनी थेट राजघराण्याचं आमंत्रण नाकारलं; आज लाडका 'गोवा' पोहोचला अंत्यदर्शनासाठी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com