Ratan Tata Funeral : उद्योग'रत्न' टाटांना अखेरचा निरोप; वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

Ratan Tata Funeral news : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसागर लोटला होता.
 Ratan Tata Business
Ratan Tata BusinessGoogle
Published On

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी सांयकाळी निधन झालं. रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उद्योग क्षेत्रात नावलौकिक निर्माण करणारे रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी सांयकाळी वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांसहित सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

रतन टाटा यांच्या निधनानंतर सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, कलाकार, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 Ratan Tata Business
Ratan Tata News: ज्येष्ठ मित्र, कर्तृत्ववान उद्योजक गमावला..' रतन टाटांच्या निधनाने राज ठाकरे गहिवरले; डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने टाटांना त्यांच्या कुलाब्याच्या निवासस्थानी मानवंदना दिली. तर रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याआधी सर्व धर्मीय प्रार्थना करण्यात आली. प्रत्येक धर्मातील धर्मगुरूंनी त्यांच्या धर्मातील रीतिरिवाज प्रमाणे प्रार्थना केली. शीख, बौद्ध, हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार अंत्यविधी करण्यात आली.

 Ratan Tata Business
Ratan Tata News: किती ती मनाची श्रीमंती! लाडक्या श्वानासाठी रतन टाटांनी राजघराण्याचं आमंंत्रण धुडकावलं; वाचा हृदयस्पर्शी किस्सा

उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांसोबत पालिका आणि टाटा ग्रुपचे कर्मचाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसीय दुखवटा जाहीर केला. मंत्रालयावरील तिरंगा झेंडा देखील अर्धा उतरवण्यात आला.

रतन टाटा यांचा आयुष्याचा प्रवास कसा होता?

रतन टाटा यांचा जन्म १९३७ साली झाला. रतन टाटा यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. त्यानंतर मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश केला. त्यांना अतुलनीय योगदानासाठी सरकारकडून पद्मविभूषण, पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रतन टाटा यांनी १९९० ते २०१२ पर्यंत टाटा ग्रुपच्या चेअरमनची भूमिका निभावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com