Worli Constituency : ठाकरेंच्या बालेकिल्यात श्रीकांत शिंदेंची एन्ट्री अन् अमित ठाकरेंची माघार? वरळीत नेमकं काय राजकारण शिजतंय? VIDEO

Maharashtra Political News : ठाकरेंच्या बालेकिल्यात श्रीकांत शिंदेंची एन्ट्री केल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाकडून वरळी विधानसभा मतदारसंघाचा घेणे सुरु आहे. दुसरीकडे वरळीत निवडणूक लढणार असल्याचे अजून ठरलं नसल्याचं अमित ठाकरेंनी सांगितलं आहे.
ठाकरेंच्या बालेकिल्यात श्रीकांत शिंदेंची एन्ट्री अन् अमित ठाकरेंची माघार? वरळीत नेमकं काय राजकारण शिजतंय?
Worli Constituency Saam tv
Published On

सूरज मसुरकर, भारत नागणे,साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे गटाने चाचपणी सुरु केली आहे. या दोन्ही पक्षांनी वरळीवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येत आहे. वरळीत शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वरळी व्हिजन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरळी बैठक आयोजित केली आहे. दुसरीकडे वरळीतून निवडणूक लढणार का,यावर अमित ठाकरे यांनी ठरले नसल्याचे म्हटलं आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आदित्य ठाकरे हे आमदार असलेल्या वरळी मतदारसंघात आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकांचे नियोजन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जागेचा आढावा शिंदे गटाकडून घेतला जात आहे. शिंदे गटाकडून भायखळा, वरळी, शिवडी, घाटकोपर या मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. वरळीतील बैठकीत मुख्य करुन वरळी मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेचा श्रीकांत शिंदेंनी महिला पदाधिकारी आणि नगरसेवकांकडून आढावा घेतला.

'वरळी मतदारसंघात ६ हजारांचा गॅप'

श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांना सूचना देताना म्हटलं की, तक्रारी- हेवेदावे बाजूला ठेवून, चांगलं काम करा. वरळी या मतदारसंघात ६ हजारांचा गॅप आहे. चांगल काम केलं तर तो गॅप आपण भरून काढू. दीड महिन्यात चांगलं काम करा, चांगल काम केल तर या मतदारसंघात साध्या कार्यकर्त्याला जरी उभं केल तरी तो निवडून येईल. दीड महिन्यात चांगलं काम करा'.

ठाकरेंच्या बालेकिल्यात श्रीकांत शिंदेंची एन्ट्री अन् अमित ठाकरेंची माघार? वरळीत नेमकं काय राजकारण शिजतंय?
Karad Latest News : भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा! गणरायाच्या गळ्यातील लाखोंची सोन्याची माळ केली परत

दरम्यान, श्रीकांत शिंदेंनी वरळीत मंगळवारी बैठक बोलावली आहे. बीडीडी चाळ एसआरए संदर्भात ही बैठक बोलावली आहे. यामुळे शिंदेंचं आगामी विधानसभा निवडणुका आणि वरळी मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.

वरळीतून अमित ठाकरे यांची माघार?

वरळीत शनिवारी मनसे वरळी व्हिजन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामुळे वरळीत अमित ठाकरे रिंगणात उतरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या चर्चेदरम्यान, अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. 'वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरले नाही. माध्यमातून बातम्या आल्या आहेत. परंतु पक्षाला जिकडे गरज लागेल, तिकडे माझी लढण्याची तयारी असल्याचे सांगत विधानसभा लढ्याचे संकेत अमित ठाकरे यांनी दिले. ते पंढरपुरात बोलत होते.

ठाकरेंच्या बालेकिल्यात श्रीकांत शिंदेंची एन्ट्री अन् अमित ठाकरेंची माघार? वरळीत नेमकं काय राजकारण शिजतंय?
Raj Thackeray : पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मनसे आक्रमक, राज ठाकरेंनी थेट इशाराच दिला

अमित ठाकरे यांच्या विधानामुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामाना होणार नाही हे देखील या निमित्ताने समोर आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अमित ठाकरे निवडणूक लढवणार चर्चा सुरू आहे. यावर अमित ठाकरे यांनीच वरळीतून निवडणूक लढवण्याचे ठरले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com