Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता; श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले, पाहा VIDEO
मुंबई : राजकीय विश्वातून एक महत्वाची बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री एकनाश शिंदे १०० जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळतेय. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागांची रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक वक्तव्य केलंय. त्यामुळे महायुतीत जागांचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय की, आम्ही १०० जांगावर निरीक्षक पाठवले आणि त्यांचं काम सुरू आहे. आता शिंदे यांच्या वक्तव्यामुळे जागावाटपाचा पेच आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे १०० जागांसाठी आग्रही असल्याचं दिसतंय. तर चर्चा करूनच महायुतीत जागावाटप होणार असल्याचं देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत देखील निर्णय होईल, असंही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.