Karad Latest News : भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा! गणरायाच्या गळ्यातील लाखोंची सोन्याची माळ केली परत

Karad Latest News update : भंगार गोळा करणाऱ्या महिलेच्या प्रामाणिपणाचे साताऱ्यात सर्वत्र कौतुक होत आहे. गणरायाच्या गळ्यातील लाखोंची सोन्याची माळ केलेल्या महिलेचं सर्वांकडून कौतुक होत आहे.
भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा! गणरायाच्या गळ्यातील लाखोंची सोन्याची माळ केली परत
Karad Latest News Saam tv
Published On

सातारा : अनेक जण गप्पा मारताना खऱ्याची दुनिया राहिली नसल्याचा डायलॉग मारत असतात. अनेक जण त्यांना आलेल्या अनुभवाला अनुसरून खऱ्याची दुनिया राहिली नसल्याची डायलॉगबाजी करताना दिसतात. पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची प्रवृती बळावल्याचा अनेकांकडून दावा केला जातो. त्यामुळे प्रामाणिपणा आणि माणुसकीचा काळच राहिला नसल्याचं अनेकांकडून बोललं जातं. मात्र, हाच दावा खोडून काढणारी घटना सातारच्या कराडमध्ये घडली आहे.

एकीकडे पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची प्रवृती आपण समाजात पाहायला मिळते. मात्र कराडमध्ये अठराविश्व दरिद्र असणाऱ्या भंगार गोळा करणाऱ्या महिलेने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे माणुसकी अजून जिवंत असल्याचं स्पष्ट झालंय.

भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा! गणरायाच्या गळ्यातील लाखोंची सोन्याची माळ केली परत
Gold - Silver Rate : सोन्याची झळाळी उतरली, चांदीची चकाकीही कमी झाली; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव काय?

कराड येथील प्रीतीसंगम परिसरात गणेश विसर्जन करताना कराडमधील गोठे येथील अधिकराव दिनकर पवार यांच्या गणेशाच्या गळ्यातील दहा तोळ्याची सुमारे आठ लाख रुपये किंमती माळ नदीत पडली. ही माळ त्याठिकाणी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहा फकीर यांना सापडली. ही माळ त्यांनी सोनारामार्फत पोलिसांना संपर्क करून माळ अधिकराव यांना परत केली. नूरजहा यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल दहा हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.

भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा! गणरायाच्या गळ्यातील लाखोंची सोन्याची माळ केली परत
Mumbai Police : पोलिसांनो, गणेशोत्सवात नाचू नका, नाहीतर...; पोलीस आयुक्तांनी आदेशच काढला!

पोलिसांनी मिळवून दिले ३५ तोळे सोने

दरम्यान, मागील महिन्यात पालघरमधील एका कुटुंबाचे २५ लाख रुपये किमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाले होते. त्यानंतर पालघरच्या नजीरुल याकूब हसन यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी बॅग शोधून मुद्देमालासह परत केली होती. नजीरुल यांना सोन्याचे दागिने पुन्हा मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com