Ratan Tata: स्वयंपाकी, ड्रायव्हर, हेल्पर, शांतनु नायडू अन् टिटो... सर्वांसाठी रतन टाटांनी मृत्यूपत्रात केली तरतूद, ३८०० कोटींच्या संपत्तीची वाटणी

Ratan Tata Property Will: रतन टाटा यांच्या ३८०० कोटींच्या संपत्तीचे विभाजन करण्यात आले आहे. रतन टाटा यांनी मृत्यूपत्रात याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात शेफ, पाळीव कुत्रा, शांतनुसाठीही बरंच काही लिहलं आहे.
Ratan Tata
Ratan TataSaam Tv
Published On

रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्रातील खूप मोठं नाव आहे. त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने फक्त भारताचे नाही तर संपूर्ण जगाचे नुकसान झाले आहे. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबत माहिती समोर आली आहे.

रतन टाटा यांनी ३८०० कोटी रुपयांची संपत्ती होती. याचे वाटप त्यांनी केले आहे. त्यांनी मृत्यूपत्रात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या आयुष्यात जोडल्या गेलल्या आणि त्यांची काळजी घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी काही न काही मागे सोडले आहे. यामध्ये रतन टाटांसोबत शेवटच्या क्षणापर्यंत असणाऱ्या स्वयंपाकी, ड्रायव्हर, केअरटेकर, कार क्लीनर यांचाही समावेश आहे. त्यांनी घर आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी ३ कोटी रुपये दिले आहे.याबाबत मृत्यूपत्रात माहिती आहे.

Ratan Tata
Ratan Tata's Will: रतन टाटांची इच्छा, शांतनू नायडू आणि डॉग टिटोसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; मृत्यूपत्रात काय लिहिलं? वाचा...

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूफत्रा लिहलं आहे की, घरा सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या घरगुती नोकरांना मालमत्तेतून १५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. हे पैसे सेवेच्या वर्षांवर आधारित इसेल.

यामध्ये पार्ट टाइम हेल्पर आणि कार क्लीनरलाही १ लाख रुपये द्यावेत, असं लिहलं आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या ३८०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला दिला आहे. यामध्ये दीर्घकाळ सेवा करणाऱ्या सेवकांचाही उल्लेख आहे.

शेफ राजन शॉ यांना १ कोटी (1 crore for Chef)

रतन टाटा यांनी त्यांच्या शेफ राजन शॉ यांना १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये दिले आहेत. ज्यात ५१ लाख रुपयांची कर्माफी समाविष्ट आहे.बटलर सुब्बैया कोनार यांना ३६ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यांना ६६ लाख रुपये मिळतील. तसेच त्यांचे सचिव डेलनाझ यांना १० लाख रुपये दिले आहेत. तसेच रतन टाटा यांचे कपडे स्वयंसेवी संस्थेला दान करावेत, असं त्यांनी मृत्यूपत्रात म्हटलं आहे.

शांतनू नायडूचे १ कोटींचे कर्ज माफ (Shantanu Naidu)

रतन टाटा यांचा मॅनेजर शांतनु नायडूचे १ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. शांतनुने कॉर्नेल विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी हे कर्ज घेतले होते. त्यांनी त्याचा शेजारी आणि ड्रायव्हर राजू यांचे १८ लाखांचे कर्ज माफ केले आहे. याचसोबत त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात म्हटलंय की, मी माझ्या कार्यकारी अधिकाऱ्यांना शॉ, कोनार, राजू लिऑन यांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी कारवाई करु नये. मी कर्जाची रक्कम भेट म्हणून दिली असे समजावे.

Ratan Tata
SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! मिळणार भरघोस परतावा; गुंतवणुकीसाठी उरले फक्त ४ दिवस

पाळीव श्वानासाठी १२ लाख रुपये

रतन टाटा यांनी आपल्या पाळीव श्वानाचा टिटोचा मृत्यूपत्रात खास उल्लेख केला आहे. जर्मन शेफर्ड कुत्र्यासाठी १२ लाख रुपये दिले आहे. त्यापैकी ३०,००० रुपये तिमाहीला दिले जातील. टिटोची काळजी घ्यायची जबाबदारी शेफ राजन शॉ यांच्यावर आहे.

Ratan Tata
Ratan Tata : रतन टाटांच्या इन्टरव्ह्यूतील एकेक शब्द हृदयाला स्पर्श करणारा! आयुष्यातील आनंदी आठवण सोशलवर होतेय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com