Saam Tv
रतन टाटा हे खूप संवेदनशील होते. त्यांनी टाटा समुहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. भारताला गौरव प्राप्त करून दिलं. रतन टाटा यांचे कोट्स जे तुम्हाला उत्तम उद्योजक बनवायला मदत करतील.
"आपली संपत्ती आणि सत्ता या दोन गोष्टी रतन टाटांच्या मते सर्वात महत्वाच्या नाहीत. "
"तुम्हाला लवकरात लवकर यश मिळवायचे असेल तर, तु्म्ही एकटे चाला. मात्र तुम्हाला जास्त काळ यश टिकवायचे असेल तर तुम्ही सगळ्यांना सोबत घेवून चाला. "
"तुमच्यावर लोक दगड फेकत असतील तर त्या दगडांना एकत्र करुन तुम्ही स्मारक तयार करा."
"आपल्या आयुष्यात येणारे अडथळे, आपल्याला जिंवत असण्याचे कारण सांगत असतात."
"एक दिवस तुम्हाला जाणवेल की भौतिक गोष्टींचा काहीच अर्थ नाही. तुमच्या आवडत्या लोकांचे कल्याण हेच महत्त्वाचे आहे."
"टिम लीटर तोच असतो जो सहकाऱ्यांपेक्षा हुशार असतो. "
"मी वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास ठेवत नाही. माझा वर्क-लाइफ इंटिग्रेशनवर विश्वास आहे. तुमचे काम आणि जीवन अर्थपूर्ण बनवा."