SCSS Scheme saam Tv
बिझनेस

SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

Senior Citizen Saving Scheme: सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत सर्वाधिक ८.२ टक्के व्याजदर मिळते.

Siddhi Hande

सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम

६० वर्षानंतर करता येणार गुंतवणूक

योजनेत मिळतंय ८.२ टक्के व्याजदर

प्रत्येकाने आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी आतापासूनच गुंतवणूक करायला हवी. वेगवेगळ्या योजना, एसआयपी, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. याचसोबत जर तुम्हाला सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम हा उत्तम पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर चांगली रक्कम मिळणा आहे.

सिनियर सिटीजन ही अशी योजना आहे की ज्यात ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक गुंतवणूक करु शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याने ५५ व्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली असेल तर तेदेखील गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात. सिंगल अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवू शकतात तर जॉइंट अकाउंटमध्ये ३० लाख रुपये गुंतवू शकतात.

सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये तुम्हाला सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे. या योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. जर तुम्ही ६० व्या वर्षी ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला आकर्षक व्याज मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला फक्त व्याजातूनच ६१५०० रुपये मिळणार आहे. वर्षाला तुम्हाला २,४६,००० रुपये व्याज मिळणार आहे. तुम्ही ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूकीचा कालावधीदेखील वाढवू शकतात. सरकार या योजनेच्या व्याजदरात बदल करत असते.

तुम्ही जर या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर वयाच्या ६५ व्या वर्षी तुमच्या हातात चांगली रक्कम असणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला या योजनेतून मिळणाऱ्या पैशांनी खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंचायतराज समितीकडून अकोला जिल्हा परिषदेची झाडाझडती

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

SCROLL FOR NEXT