Surabhi Jayashree Jagdish
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सर्वात आनंदाचा क्षण तोच असतो, जेव्हा त्यांच्या खात्यात पगार जमा होतो.
मात्र, बहुतांश लोक बचत न होण्यामुळे सतत त्रस्त राहतात.
आज जाणून घेऊया की आपण आपल्या पगारातून बचत कशी करू शकतो.
सर्वप्रथम महिनाभर होणाऱ्या खर्चांची यादी तयार करा. जस की किराणा, भाडे, वीज-पाणी-बिल इत्यादी.
आपण योग्य बजेट तयार करू शकता आणि अनेक अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवू शकता.
समजा पगार ४०,००० रुपये असेल, तर त्यातील किमान २५% रक्कम वेगळी काढून थेट बचतीसाठी ठेवा. यामुळे आपण खर्चांपूर्वीच बचतीला प्राधान्य देऊ शकता.
याशिवाय काही गैर-आवश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा जसं की, वारंवार बाहेर खाण्यावर पैसे खर्च करणे टाळा.
आपण दर महिन्याला छोटे-छोटे उद्दिष्ट ठेवूनही पैसे वाचवू शकता. हे उपाय नक्की करून पाहा आणि आपल्या बचतीत वाढ करा.