Samsung Galaxy F15 5G Launched in India Know Features Details in Marathi Saam Tv
बिझनेस

Samsung Galaxy F15: 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केला 5G फोन, 12000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

Samsung Galaxy F15 5G Features and Price: आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने आपल्या Galaxy F सीरीजमध्ये वाढ करत नवीन Samsung Galaxy F15 5G भारतात लॉन्च केला आहे.

Satish Kengar

Samsung Galaxy F15 5G Launched in India:

आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने आपल्या Galaxy F सीरीजमध्ये वाढ करत नवीन Samsung Galaxy F15 5G भारतात लॉन्च केला आहे. यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जर सपोर्ट ग्राहकांना मिळणार आहे.

Samsung Galaxy F15 5G 12,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 4GB + 128GB इंटरनल स्टोरेज असेल. याशिवाय 6GB + 128GB स्टोरेज 14999 रुपयांना मिळेल. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारांवर 1,000 ची सूट ग्राहकांना मिळणार आहे. यानंतर याची किंमत 11,999 रुपये होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साज संध्यकाळी सुरू होईल विक्री

सॅमसंगचा हा नवीन फोन फ्लिपकार्ट, सॅमसंग स्टोअर आणि इतर ऑफलाइन स्टोअरमधून ग्राहक खरेदी करू शकतात. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून याची विक्री सुरु होणार आहे. कंपनी सॅमसंग 25W फास्ट चार्जिंग ॲडॉप्टर 299 रुपयांना देत आहे. ज्याची किंमत 1299 रुपये आहे.  (Latest Marathi News)

Samsung Galaxy F15 5G स्पेसिफिकेशन

या नवीन फोनमध्ये कंपनी 2340x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देत आहे. हा फुल एचडी + डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये MediaTek Dimension 6100 Plus चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे.

यामध्ये 50-मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा, 5-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा मिळेल. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आलीआहे. ही बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.0 वर काम करतो. कंपनी या फोनला 4 जनरेशन अँड्रॉइड अपडेट्स आणि 5 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स देईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय आणि 3.5 मिमी जॅक सारखे पर्याय असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT