भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आपली सर्वाधिक विक्री होणारी SUV Nexon चा डार्क एडिशन लॉन्च केला आहे. टाटा नेक्सॉनच्या ICE प्रकार आणि EV प्रकारात डार्क एडिशन मिळेल. यातच इलेक्ट्रिक कार सेगमेंट मार्केटवर एकट्या टाटा मोटर्सचे 75 टक्क्यांहून अधिक नियंत्रण आहे.
याशिवाय कंपनीने आपल्या लोकप्रिय नवीन टाटा सफारी आणि नवीन हॅरियरचाही डार्क एडिशन लॉन्च केला आहे. Tata Nexon Dark Edition ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 11.45 लाख रुपये आहे. नवीन लॉन्च झालेल्या कार्सच्या डार्क एडिशनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Tata Nexon EV ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. Tata Nexon EV डार्क एडिशनच्या इंटिरिअरमध्ये ग्राहकांना SOS कॉलिंग फंक्शन, डिजिटल कॉकपिटमध्ये एम्बेडेड मॅप्स व्ह्यू आणि ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर यांसारखी नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय कारमध्ये 31.24 सेमी सिनेमॅटिक टचस्क्रीन सिस्टीमही देण्यात आली आहे. या कारची रेंज 465 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (Latest Marathi News)
टाटा नेक्सॉन डार्क एडिशनचा बाहेरील भाग बोल्ड आणि स्पोर्टी लूक देतो. या कारचे आतील भाग आलिशान आणि विशेष सर्व ब्लॅक थीमने सुसज्ज आहे. कारच्या केबिनमध्ये हिडन टिल लिट कॅपेसिटिव्ह टच एफटीसी पॅनल देखील देण्यात आले आहे. याशिवाय कारमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
नवीन लॉन्च केलेल्या 5-सीटर टाटा हॅरियर डार्क एडिशन आणि 7-सीटर टाटा सफारी डार्क एडिशनच्या बाहेरील आणि आतील भागात देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. Tata Harrier मध्ये समोरील बाजूस सेंटर पोझिशन लॅम्प आणि LED DRL देण्यात आलं आहे.
जर आपण या कारच्या डार्क एडिशनच्या किंमतीबद्दल बोललो तर, टाटा नेक्सॉनची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 11.45 लाख रुपये आहे. तर Tata Nexon EV डार्क एडिशनची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 19.49 लाख रुपये आहे. तसेच नवीन टाटा हॅरियर डार्क एडिशनची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे. तर Tata New Safari Dark Edition ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 20.69 लाख रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.