सॅमसंग लवकरच Samsung Galaxy S24 FE 5G लॉन्च करू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र नवीन मॉडेल येण्यापूर्वी जुने मॉडेल हजारो रुपयांच्या सवलतीसह ग्राहकांसाठी उपलब्ध झालं आहे. आम्ही ज्या मॉडेलबद्दल बोलत आहोत, ते आहे Samsung Galaxy S21 FE 5G.
कंपनीने मागील वर्षी जुलैमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह हा स्मार्टफोन पुन्हा लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी याची किंमत 50 हजार रुपये होती. मात्र आता हा फोन किमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
येथे आम्ही तुम्हाला फोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटवर उपलब्ध डीलबद्दल सांगत आहोत. लॉन्चच्या वेळी याची किंमत 49,999 रुपये होती. हा फोन ग्रेफाइट, लॅव्हेंडर, ऑलिव्ह, व्हाइट आणि ब्लू या पाच रंग प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण या फोनचा ऑलिव्ह कलर व्हेरिएंट Amazon वर फक्त 32,995 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच याच्या लॉन्च किंमतीपेक्षा 17,004 रुपये कमी आहे. (Latest Marathi News)
मात्र ही ऑफर इथेच संपत नाही. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही याची किंमत आणखी कमी करू शकता. यातच हाच व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 33,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर अधिकृत वेबसाइटवर 39,999 रुपयांना उपलब्ध आहे.
फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस सेफ्टीसह 6.4-इंचाचा AMOLED 2X डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
फोनमध्ये स्टँडर्ड 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 8-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी, यात 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.