IRCTC Tour Packag: रामायणाशी संबंधित श्रीलंकेतील प्रमुख तीर्थक्षेत्रांना स्वस्तात देता येणार भेट, IRCTC ने आणला जबरदस्त टूर पॅकेज

Sri Lanka Tour Package: IRCTC ने तुमच्यासाठी एक अतिशय जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत, तुम्हाला श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
IRCTC Ramayana Sri Lanka Tour Packag
IRCTC Ramayana Sri Lanka Tour PackagSaam Tv
Published On

IRCTC Ramayana Sri Lanka Tour Packag:

जर तुमचीही रामायणाशी संबंधित प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असे, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. IRCTC ने तुमच्यासाठी एक अतिशय जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत, तुम्हाला श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

IRCTC च्या या टूर पॅकेज अंतर्गत, तुम्हाला कोलंबो, कँडी, नेगोंबो, न्यू एलिया इत्यादी अनेक लोकप्रिय ठिकाणी नेले जाईल. नैसर्गिक सौंदर्यामुळे श्रीलंका हे जगभरात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. याशिवाय श्रीलंकेचे रामायणाशी विशेष नाते आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IRCTC Ramayana Sri Lanka Tour Packag
Solar Rooftop Scheme: सोलर रूफटॉप योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! एक कोटी कुटुंबांना महिन्याला मिळणार ३० हजार रुपये

यामुळेच दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक रामायणाशी संबंधित प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी येथे येतात. तुम्हालाही श्रीलंकेतील या प्रमुख ठिकाणांना भेट द्यायची असेल. तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या सुविधा मिळत आहेत. या टूर पॅकेजचे नाव आहे श्रीलंका - रामायण सागा (SRI LANKA - THE RAMAYANA SAGA).  (Latest Marathi News)

Ramboda waterfalls
Ramboda waterfallsGoogle.com

IRCTC च्या या टूर पॅकेजचा कोड NLO15 आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला एकूण 6 रात्री आणि 7 दिवस विविध ठिकाणे दाखवले जातील. हे टूर पॅकेज 9 मार्च 2024 रोजी लखनौपासून सुरू होत आहे. हे IRCTC चे फ्लाइट टूर पॅकेज आहे.

Hasalaka
HasalakaGoogle.com
IRCTC Ramayana Sri Lanka Tour Packag
PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात आले नाही? जाणून घ्या काय आहे कारण

तसेच इतर ठिकाणी तुम्हाला बसने नेले जाईल. या टूर पॅकेज अंतर्गत, तुमचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था IRCTC द्वारे केली जाईल. याशिवाय तुमच्या राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्थाही केली जाईल.

या टूर पॅकेजच्या किंमतबद्दल बोलायचं झालं तर एका व्यक्तीला यासाठी 88,800 रुपये द्यावे लागतील. तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर, यात तुम्हाला प्रति व्यक्ती 72,200 रुपये भाडे द्यावे लागेल. तीन लोकांसह प्रवास केल्यास प्रति व्यक्ती भाडे 71,000 रुपये द्यावे लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com