तुम्ही जर शेतकरी असाल, तर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजेनचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकार ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी चालवते. यातच आता सरकारने या योजनेच्या 16 व्या हप्ताचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 9 कोटी पात्र शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळाला आहे.
मात्र यात अनेक शेतकरी असेही आहेत, ज्यांच्या खात्यात 16 व्या हप्ताचे पैसे आलेले नाही. यातच जर तुम्हीही असाल, तर 16 व्या हप्ताचे पैसे तुमच्या बँक खात्यात का नाही आले, हे जाणून घ्या... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पहिलं कारण
जर तुमच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे आले नाहीत, तर भू-सत्यापन न करणे हे त्यामागचे एक कारण असू शकते. या योजनेशी निगडित प्रत्येक शेतकऱ्याने हे काम करून घेणे आवश्यक असल्याचे सरकारकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. (Latest Marathi News)
दुसरं कारण
तुम्ही ई-केवायसी केले नसले तरीही तुमचा हप्ता अडकू शकतो. नियमानुसार योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना हे काम करून घेणे बंधनकारक आहे. अशातच जर तुम्ही हे काम केलं नसेल, तर तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता.
तिसरं कारण
हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी आधार लिंकिंग करणे देखील आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यांनाही हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहावं लागलं आहे. जर तुमचा हप्ता अडकला असेल तर हे त्यामागचे एक कारण असू शकते.
चौथं कारण
तुमच्या अर्जामध्ये नाव, लिंग, आधार क्रमांक यासारखी काही चूक असल्यास किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असल्यास, तुमचा हप्त्याचे पैसे अडकू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.