Solar Rooftop Scheme: सोलर रूफटॉप योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! एक कोटी कुटुंबांना महिन्याला मिळणार ३० हजार रुपये

Central Government Schemes: रूफटॉप सोलर योजनेसाठी केंद्र सरकारने 75 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Solar Rooftop Scheme
Solar Rooftop SchemeSaam Tv
Published On

Solar Rooftop Scheme:

रूफटॉप सोलर योजनेसाठी केंद्र सरकारने 75 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली आहे.

ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रूफटॉप सोलर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळू शकणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रति किलोवॅट प्रणाली 30 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. याशिवाय 2 किलोवॅट प्रणाली अंतर्गत 60 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Solar Rooftop Scheme
PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात आले नाही? जाणून घ्या काय आहे कारण

या योजनेअंतर्गत, कोणतेही कुटुंब राष्ट्रीय पोर्टलला भेट देऊन अनुदानासाठी अर्ज करू शकते आणि छतावरील सोलर रूफटॉप योजेनसाठी कोणताही व्हेंडरला निवडू शकतात. याशिवाय त्यांना कमी व्याजावर कर्जही मिळू शकते. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर योजना बनवण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.  (Latest Marathi News)

ही गावे आदर्श म्हणून तयार केली जातील रोल मॉडेल म्हणून तयार करण्यात येणार, जेणेकरून ग्रामीण भागात याबाबत जागरूकता निर्माण करता येईल. या योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली होती. तुम्ही योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Solar Rooftop Scheme
Indian Railways : रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! पॅसेंजर ट्रेनच्या तिकिटाचे दरात मोठी कपात

1. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. यामुळे ग्राहकांची महिन्याला हजारो रुपयांची बचत होणार आहे.

2. सोलर प्लांटमधून शिल्लक राहिलेली अतिरिक्त वीज नागरिक वीज कंपन्यांना विकू शकतील आणि त्यांना यातून पैसेही मिळतील.

3. निवासी भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारून 30 GW वीजही तयार केली जाईल.

4. यामुळे पुढील 25 वर्षांत कार्बन उत्सर्जन 720 मिलियन टनांनी कमी होईल.

5. ही योजना उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री आणि इतर सेवांमध्ये 17 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com