ह्युंदाईच्या नवीन क्रेटाला सध्या ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यातच नवीन CRETA चे N Line प्रकार लॉन्च होणार आहे. कंपनीने याची बुकिंग सुरू केली आहे. एन लाइन ही कंपनीची हाय परफॉर्मन्स सीरीज आहे. जर तुम्हाला ड्रायव्हिंगची खरी मजा घ्यायची असेल, तर ह्युंदाईची एन लाईन सीरीज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
ग्राहक नवीन CRETA N-Line ची बुकिंग Hyundai डीलरशिप वरून करू शकतात. तसेच ऑनलाइन बुकिंगचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही 25,000 रुपये टोकन रक्कम भरून नवीन CRETA N-Line बुक करू शकता. क्रेटा एन लाइनची किंमत 18 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेग्युलर क्रेटाच्या तुलनेत, क्रेटा एन-लाइनच्या बाहेरील डिझाइनपासून आतील भागात काही बदल पाहिले जाऊ शकतात. बाहेरील लूकला स्पोर्टी टच देण्यासाठी, कनेक्टेड LED DRL, स्पोर्टी अलॉय व्हील, ड्युअल एक्झॉस्ट आणि स्पोर्टी बंपरसह नवीन ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय यात एन-लाइन बॅजिंग देखील दिसेल. एन-लाइन बॅजिंग, व्हेंटिलेटेड सीट्स, 10.25-इंच टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी अनेक खास फीचर्स यात देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन क्रेटा एन-लाइनमध्ये 42 स्टँडर्ड फीचर्ससह 70 हून अधिक अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि हिल असिस्ट अशी फीचर्स देण्यात आली आहेत. इतकेच नाही तर यात लेव्हल-2 ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS), ISOFIX चाइल्ड सीट माउंट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ABS सह EBD सुविधा, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, क्रूझ कंट्रोल आणि फ्रंट-रियर कॅमेरा मिळेल.
नवीन Creta N-Line ची स्पर्धा Skoda Kushaq, Volkswagen Taigun GT Line, Kia Seltos GTX+ आणि X-Line शी होईल. याशिवाय मारुती ग्रँड विटारा आणि होंडा एलिव्हेट यांनाही ही कार टक्कर देईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.