Paytm Payment Bankला मनी लाँड्रिंग प्रकरणात ५.४९ कोटींचा दंड; फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटची कारवाई

Paytm Payment Bank: फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (FIU) ने मनी लाँड्रिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल Paytm Payment Bankवर कारवाई करण्यात आलीय.
Paytm Payment Bank
Paytm Payment BankSaam Tv
Published On

Paytm Payment Bank :

Paytmवरील संकट कमी होताना दिसत नाहिये. मनी लाँड्रिंग प्रकरणात Paytm Payment Bankला ५.४९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (FIU) ने मनी लाँड्रिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिलीय.(Latest News)

फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला तपास यंत्रणांकडून पेटीएम पेटेमंट्स बँकेच्या काही बेकायदेशीर हालचालींबद्दल माहिती मिळाली होती. यामध्ये ऑनलाइन जुगार इत्यादीचा समावेश आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने पेटीएम पेमेंट्स बँकेचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वित्त मंत्रालयाने कारवाईविषयीची माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आलीय. फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिट- इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेचे काही युनिट्स आणि नेटवर्क ऑनलाइन जुगारासारख्या बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असल्याचे शोधून काढण्यात आले.

या बेकायदेशीर ऑपरेशन्समधून मिळालेले पैसे बँक खात्यांद्वारे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या या युनिट्समध्ये पाठवले गेले. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर मोठी कारवाई करण्यात आली होती. सेंट्रल बँकेने पेटीएमची बँकिंग सेवा २९ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ही मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय.

पेटीएम फास्टॅग होल्डर्ससाठी महत्त्वाची बातमी

जर तुमचे फास्टॅग पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडले असेल तर लवकर ते दुसऱ्या अकाउंटवर पोर्ट करुन घ्या. पेटीएम पेमेंट्स बँकेतून आता तुम्हाला फास्टॅग सेवा सुरु ठेवता येणार नाहीये. तुम्ही बँकेतील फास्टॅगचे खाते बंद करु शकता किंवा पोर्ट करु शकता.

१५ मार्चनंतर पेटीएम क्यूआर कोड

कंपनीचे मेड-इन-इंडिया क्‍यूआर कोड, साऊंडबॉक्‍स आणि कार्ड मशिन १५ मार्च २०२४ नंतर देखील नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. शुक्रवारी भारतीय रिझर्व्‍ह बँकेने (आरबीआय) एफएक्‍यू रिलीज केल्‍यानंतर याची घोषणा केली.

Paytm Payment Bank
Fastag KYC अपडेट करण्याची शेवटची मुदत! ऑनलाइन-ऑफलाइन कसे कराल लिंक, पाहा प्रोसेस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com