Youtuber Nisha Madhulika Success Story: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे आहे. लहानांपासून, मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच सोशल मीडियाचे वेडं लागलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण स्टार झाले, श्रीमंत झाले. नागपूरचा डॉली चहावाला असो किंवा दिल्लीची वडापाव गर्ल असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून शून्यातून सुरुवात अनेकांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. सोशल मीडियावरील असेच एक लोकप्रिय नाव म्हणजे निशा मधुलिका.
स्वयंपाकाच्या साध्या- साध्या रेसिपी दाखवून युट्यूबवरुन कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या व्यक्तींमध्ये निश मधुलिका यांच्या नावाचा समावेश आहे. निशा मधुलिका या भारतातील सर्वात श्रीमंत महिला युट्यूबर म्हणून ओळखल्या जातात. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या निशा यांनी वयाच्या ६० व्या वर्षी आपला चॅनेल सुरु केला अन् यशस्वी झेप घेतली. म्हणूनच त्यांचा प्रवास अन् संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादयी आहे.
निशा मधुलिका या एक अशा महिला आहेत ज्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी आपला युट्यूब चॅनेल सुरु केला अन् सातत्य, संघर्ष, चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. ही कथा केवळ यशस्वी युट्यूबर होण्याची नही तर जिद्द अन चिकाटी असेल तर यशाचे शिखर गाठता येते याचीच प्रेरणा देणारा प्रवास आहे. निशा मधुलिका यांचा जन्म आणि बालपण उत्तर प्रदेशमध्ये गेले. त्यांनी विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच त्यांना चांगले जेवण बनवण्याची आवड होती. लग्नानंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या. पण पतीच्या व्यवसायात आल्यानंतरही त्यांची स्वयंपाकाची आवड कायम राहिली. याच आवडीने त्यांना युट्यूबवर व्हिडिओ बनवण्याची कल्पना सुचली.
निशा मधुलिका यांनी 2007 मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. 2011 मध्ये त्याने यूट्यूबवर कुकिंगचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. याकाळात इंटरनेट सहज उपलब्ध होत नव्हते.1 GB डेटा घेण्यासाठी जवळपास 300 रुपये मोजावे लागत होते. बहुतेक लोक नेट कॅफे आणि ब्रॉडबँडमध्ये इंटरनेट वापरत असत. मात्र तरीही मधुलिका यांनी जिद्दीने त्यांचा प्रवास सुरु केला. हळूहळू व्हिडिओंना लोकप्रियता मिळाली आणि आज त्या YouTube वर 14.4 दशलक्षाहून अधिक सबक्रायबर्स एक प्रसिद्ध युट्यूबर बनल्या आहेत.
त्यांच्या अधिकृत चॅनेलवर सुमारे 2200 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. निशा मधुलिका यांचा यूट्यूब चॅनल केवळ कुकिंग व्हिडिओंपुरता मर्यादित नाही. त्यांनी ऑनलाइन साम्राज्य देखील तयार केले आहे, जे 5 व्यावसायिकांच्या टीमद्वारे चालवले जाते. त्यांच्या यशामागे त्यांच्या टीमचाही मोठा हातभार आहे, जे त्यांचे व्हिडिओ बनवण्यापासून ते एडिटिंग आणि प्रमोशनपर्यंतचे काम पाहतात. स
काही रिपोर्ट्सनुसार, निशा मधुलिकाची अंदाजे एकूण संपत्ती 43 कोटी रुपये आहे. मात्र ही अधिकृत आकडेवारी नाही. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये हे संकलित करण्यात आले आहे. YouTube जाहिराती, प्रायोजित सामग्री आणि ब्रँड डील हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्या केवळ यूट्यूबवरच नाही तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय आहेत. निशा मधुलिकाचे कुटुंब नेहमीच तिच्यासाठी प्रेरणास्थान राहिले आहे. तिच्या पतीने तिच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि तिच्या YouTube करिअरमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.