Pimpri Chinchwad : युट्यूब पाहून चोरी करायला शिकला; तरुणाने तब्बल १८ महागड्या दुचाकी चोरल्या, असा अडकला जाळ्यात

Pimpri Chinchwad Crime news : युट्यूब पाहून तरुण चोरी करायला शिकला. त्यानंतर या तरुणाने तब्बल १८ महागड्या दुचाकी चोरल्या आहेत. या चोरीनंतर तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
युट्यूब पाहून चोरी करायला शिकला; तरुणाने तब्बल १८ महागड्या दुचाकी चोरल्या, असा अडकला जाळ्यात
Pimpri ChinchwadSaam tv
Published On

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एक तरुणाने युट्यूबवरून चोरी करायचं शिकला. त्यानंतर या तरुणाने परिसरातील १८ महागड्या दुचाकी चोरल्या. पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाने एका अल्पवयीन मुलीच्या मदतीने १८ महागड्या दुचाकी चोरल्या आहेत. शहरातील १८ महागड्या दुचाकी चोरीला गेल्याने परिसरात दुचाकी चोरीची भीती परसरली होती.

युट्यूबवर दुचाकी चोरी करण्याचे व्हिडियो पाहून पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणाने आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने जवळपास 18 महागड्या दुचाकी वाहन चोरी केले आहेत. अभिषेक मल्लाप्पा हावळेकर असे या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचं नाव आहे. अभिषेक मल्लाप्पा हावळेकर हा मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

युट्यूब पाहून चोरी करायला शिकला; तरुणाने तब्बल १८ महागड्या दुचाकी चोरल्या, असा अडकला जाळ्यात
Mumbai Cyber Crime: नवाब मलिक यांच्या 'मनी लाँन्ड्रिंग' केसचा वापर, तब्बल २ कोटींना घातला गंडा; मुंबईतील प्रकाराने खळबळ

घरच्यांशी भांडण झाल्यानंतर तो खेड तालुक्यातील चाकण येथे राहण्यात आला होता. त्यानंतर त्याने युट्यूबवर दुचाकी चोरण्याचे व्हिडिओ पाहिले. त्यानंतर त्याने त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने जवळपास 18 महागड्या दुचाकी वाहने चोरी केले आहेत. महामार्गालगत सीसीटीव्ही कॅमेरे कमी असल्याने अभिषेक मल्लाप्पा हावळेकर आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने दुचाकी वाहन चोरी केले आहेत.

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने जवळपास 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तांत्रिक विश्लेषण करून अभिषेक मल्लाप्पा हावळेकर आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक मल्लाप्पा हावळेकर याच्याकडून पोलिसांनी १८ महागडे दुचाकी वाहन जप्त केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास 16 दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

युट्यूब पाहून चोरी करायला शिकला; तरुणाने तब्बल १८ महागड्या दुचाकी चोरल्या, असा अडकला जाळ्यात
Akola Crime News: गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर तरुणाचा चाकूहल्ला, भरस्त्यात थरार, पाहा VIDEO

माजी आमदारांच्या मेडिकलमध्ये चोरी, कोळशेवाडी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

मौज, मस्ती, नशेसाठी मेडिकलचे शटर उचकटून चोरी करणारे दोघे अल्पवयीन मुलांना कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या ताब्यात घेतलेल्या मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या मेडिकलचे शटर उचकटून मेडिकलमधून रोकड चोरी केली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांत चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना शोधून ताब्यात घेतलं. दोघं अल्पवयीन मुलं मौजमस्ती आणि नशा करण्यासाठी चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन मुलांना चोरी करायला भाग पाडलं, त्या आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com