केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जीएसटी दरांमध्ये कपात केली आहे. आता जीएसटीचे फक्त दोन टॅक्स स्लॅब आहेत. दरम्यान, जीएसटी कमातीनंतर आता आरबीआय अजून एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता जीएसटी कपातीनंतर ईएमआयचा भारदेखील कमी होणार आहे. आरबीआय फ्लोटिंग रेट कर्जाचा ईएमआय कमी करणार आहे.
आता फ्लोटिंग व्याजदराने कर्ज घेतल्यास तुम्हाला नवीन सुविधा मिळणार आहे. बँका ३ वर्षांच्या लॉक इनपूर्वीही ईएमआय कमी करु शकतील. याचा थेट फायदा थेट कर्जदारांना होणार आहे. हा निर्णय घेतल्यावर हप्ता कमी होणार आहे.
आता आरबीआयच्या या निर्णयाचा फिक्स्ड रेट कर्जदारांनादेखील होणार आहे. आता एफडीधारकांना हा पर्याय निवडता येणार आहे. निश्चित व्याजदराचे कर्ज घेतल्यावर तुम्हाला फ्लोटिंग दरात स्विच करण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे कर्जदारांना त्यांच्या इच्छेनुसार किंवा बाजारानुसार योग्य व्याजदर निवडण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ते त्यांना वाटेल तेव्हा फ्लोटिंग कर्जात स्विच करु शकतात.
फ्लोटिंग व्याजदर काय आहे? (What is Floating Rate Of Interest)
फ्लोटिंग व्याजदर म्हणजे ज्याचे व्याजदर सतत बदलत असते. कर्जाच्या कालावधीत हे व्याजदर कधीही बदलू शकते. हे व्याजदर बाजारातील चढ-उतारांवर आणि बेंचमार्क दरांवर अवलंबून असतो.हा दर फिक्स्ड व्याजदराच्या उलटा असतो. हा व्याजदर होम लोन, बॉण्ड्स आणि इतर कर्जांमध्येही उपलब्ध असतो. बाजारात दर कमी असताना फ्लोटिंग दरावर कर्ज घेणे फायदेशीर ठरते.
गोल्ड लोन मिळणेही होणार सोपे
आरबीआयने गोल्ड लोनबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी फक्त सोनारांना गोल्ड लोनचा पर्याय उपलब्ध होता. आता लहान कारागीर आणि लघु व्यावसायिकांनाही सोने कच्चा माल म्हणून लोन घेण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे MSME ला भांडवल उभारणे सोपे होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.