तुम्ही लोनवर फोन खरेदी केलाय का? तर आता तुमचा फोन आपोआप लॉक होऊ शकतो...होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरयं... भारतात अनेक जण ईएमआयवर मोबाईल खरेदी करतात.. मात्र फोनच्या खरेदीनंतर हप्ता भरण्यासाठी टाळाटाळ करतात... अशाच काही कर्जबुडव्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे...आरबीआयनं जारी केलेल्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीनं मोबाईलसाठी घेतलेल्या हप्त्यांची वेळेत परतफेड केली नाही, तर एनबीएफसी त्याचा मोबाईल ल़ॉक करू शकते...ही यंत्रणा नेमकी कशी काम करणार पाहूयात...
पेटीएम, फोन पे आणि इतर फिनटेक प्लॅटफॉर्म्सकडून कर्ज घेणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल. कर्ज घेताना ग्राहकांच्या मोबाईलचा IMEI क्रमांक नोंदवला जाईल. जर खरेदीदारानं 90 दिवसांपर्यंत ईएमआयचा हप्ता भरला नाही तर कर्जदाता त्या फोनला ट्रॅकिंग मोडमध्ये टाकणार. ज्यामुळे फोनवरुन कॉल करणे, मेसेज पाठवणं आणि अॅप्सचा वापर करणे बंद होईल.
छोट्या रकमेच्या कर्जांच्या वसुलीसाठी आरबीआयनं हे महत्त्वाचं पाऊल उचललयं...मात्र आरबीआयनं हा कठोर निर्णय नेमका का घेतलाय? पाहूयात...
2022 मध्ये डिजीटल कर्जाचा NPA 2.5 टक्के होता. तो 2024 मध्ये 5 टक्के झाला आहे. छोट्या कर्जांमध्ये 5000 ते 50000 रुपयांच्या कर्जाचा समावेश होते. काही लोक कर्जाचे हप्ते न भरता गायब होतात. 2023 मध्ये फोन पेनं 10000 थकबाकीदारांचे फोन ब्लॉक करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र, आरबीआयनं त्याला स्थगिती दिली होती. मात्र आता आरबीआयनं त्याला कायदेशीर रुप देऊन प्रत्यक्षात आणण्याबाबत विचार करत आहे.
भविष्यात हा नियम लागू झाल्यास कर्ज देणाऱ्या कंपन्यांना वसुली करणं सोप होईल.. तसचं ग्राहकांचं क्रेडिट स्कोअर सुधारेल. यामुळं डिजीटल कर्ज बाजाराला मजबुती मिळेल.. आणि कर्जबुडव्यांची नाकेबंदी होईल, हे नक्कीच...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.