देशातल्या नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे...EPFO नं जानेवारी 2026 पासून नवी सुविधा लागू करण्याची तयारी सुरु केलीय.. आता कर्मचाऱ्यांना आपले पीएफचे पैसे थेट एटीएममधून काढता येणार आहेत....EPFO संबंधित निर्णय घेणाऱी संस्था 'सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज'च्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत याला अंतिम मंजुरी देण्यात येईल.
सध्याच्या प्रणालीत पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर मंजुरी आणि पैसे मिळण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागते. मात्र, नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर कर्मचारी थेट एटीएममध्ये जाऊन पैसे काढू शकतील. त्यामुळे ऑनलाईन क्लेमचा त्रास कमी होईल. तसचं आपत्कालीन परिस्थितीत निधी मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. मात्र ATMमधून पैसे विड्रॉल करण्यासाठी मर्यादा असणार आहे. तसचं EPFO विशेष ATM कार्ड सदस्यांना देणार आहे.
EPFO च्या या निर्णयामुळे कोट्यवधी सदस्यांना याचा फायदा होणार आहे..
सध्या ईपीएफओत सुमारे 7.8 कोटी सदस्य नोंदणीकृत आहेत. EPFO संस्थेकडे सदस्यांचा तब्बल 28 लाख कोटींचा निधी जमा आहे. 2014 मध्ये EPFO कडे फक्त 7.4 लाख कोटी निधी आणि सदस्यसंख्या 3.3 कोटी इतकी होती.
त्यामुळे गेल्या काही वर्षांत EPFO ची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नवीन सुविधा सुरू झाल्यास कर्मचाऱ्यांना आपला पीएफ काढणं सोप्प होईल तसंच ऑनलाईन क्लेमसह इतर बाबतीत होणारा मनस्तापही होणार नाही..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.