RBI Recruitment Saam Tv
बिझनेस

RBI Grade B Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ग्रेड बी ऑफिसर पदासाठी भरती; आजच करा अर्ज

RBI Grade B Officer Recruitment 2026: रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

अशा पद्धतीने होणार भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ग्रेड बी ऑफिसर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया २९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. जे तरुण सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही योग्य संधी आहे. त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

रिझर्व्ह बँकेत ६० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये आर्थिक धोरण संशोधन विभाग आणि सांख्यिकी माहिती व्यवस्थापन विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेत भरती (RBI Grade B Officer Recruitment)

रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी पदांसाठी अर्जप्रक्रिया २९ एप्रिल म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२६ आहे. ही भरती परीक्षेद्वारे होणार आहे. दोन परीक्षा होणार आहे. या नोकरीसाठी पहिली परीक्षा १४ जून रोजी होऊ शकते. यानंतर टप्पा दोन ऑनलाइन परीक्षा २५ जुलै २०२६ रोजी होऊ शकते. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करावी.

या पदांसाठी होणार भरती

ग्रेड बीमधील अधिकारी जनरल पदासाठी ४० जागा रिक्त आहे. ग्रेड ही अधिकारी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन विभागात १० पदे रिक्त आहेत. सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभागात १० पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

रिझर्व्ह बँकेच्या ग्रेड बी ऑफिसर पदासाठी विभागानुसार पात्रता वेगवेगळी असणार आहे. ग्रेड बी जनरलसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. ग्रेड बी डीआर पदासाठी अर्थशास्त्र किंवा वित्त क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. ग्रेड बी डीआयएसएमसाठी सांख्यिकी, गणित किंवा डेटा क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.

रिझर्व्ह बँकेतील या भरतीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी प्रिलियम्स, मेन्स अशा दोन परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुलाखत होणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनील तटकरेंना बालेकिल्ल्यात जोरदार धक्का; दिवेआगारची सत्ता गेली

Maharashtra News Live Update: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय थालपथीचे शिर्डीच्या साई मंदिरात आगमन

Malai Kulfi Recipe: उन्हाळ्यात खा थंडगार मलाई कुल्फी, घरीच ट्राय करा सोपी रेसिपी

IRCTC ची मोठी घोषणा! बुद्धिस्ट सर्किट ट्रेनच्या प्रवासावर मिळणार २०% डिस्काउंट; जाणून घ्या वेळापत्रक

Shocking : अंघोळीचा साबण खाऊन २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, नाशिकमध्ये भयंकर घडलं!

SCROLL FOR NEXT