मुंबईत एसीबीची मोठी कारवाई; बीएमसी अधिकारी 2,50,000 लाच घेताना रंगेहाथ सापडला

Mumbai crime news : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई केली आहे. लाच घेताना अधिकरी रंगेहाथ सापडला आहे.

मुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. विशाल भालचंद्र वाणी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अधिकारी एफ नॉर्थ विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत आहे. बांधकाम साईटसाठी जल निष्कासन परवानगीसाठी १० लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर या अधिकाऱ्याला सापळा रचून एसीबीने कारवाई केली. अडीच लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. संबंधित अधिकारी प्रजन्य जल वाहिनी विभागात कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com