RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

RBI JE Recruitment 2026: इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.
RBI Recruitment
RBI RecruitmentSaam Tv
Published On

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेत सिविल आणि इंजिनियरिंग ब्रँचमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

RBI Recruitment
Indian Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार बँकेत नोकरी, पगार ८५,९२० रुपये; पात्रता काय?वाचा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी opportunities.rbi.org.in वर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही १६ एप्रिलपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी १६ एप्रिल ते ६ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत तुम्हाला परीक्षेसाठी फी भरायची आहे. या नोकरीसाठीची परीक्षा ६ जून २०२६ रोजी होणार आहे.

पात्रता

ज्युनिअर इंजिनियर पदासाठी तुम्ही इंजिनियरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. सिविल इंजिनियरिंग पूर्ण केलेल्या तरुणांसाठीही ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे २ वर्षांचा अनुभव असायला हवा.डिग्री असणाऱ्या उमेदवारांकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा.

ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिक पदासाठी उमेदवारांना इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. डिप्लोमाधारकांकडे २ वर्षांचा अनुभव असायला हवा.डिग्री केलेल्या उमेदवारांकडे १ वर्षाचा अनुभव असायला हवा.

RBI Recruitment
Desk Job Cancer Risks: 8 तास बसून काम, ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्यांना वॉर्निंग, कॅन्सरचा अधिक धोका, काय सांगतात डॉक्टर?

रिझर्व्ह बँकेत एकूण ११ पदांसाठी भरती केली जाणार आहे. २०-३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला बेसिक सॅलरी ४७,७०० रुपये मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक भत्ते मिळणार आहे. एकूण तुम्हाला ९१,३०९ रुपये मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टद्वारे होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी करायची आहे.

RBI Recruitment
High Income Job: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com