Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: २५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार अन् मोफत औषधे; सरकारची खास योजना

Rajasthan Scheme 25 Lakh Cashless Treatment: राजस्थान सरकारने मुख्यमंत्री निशुल्क निरोगी राजस्थान योजना सुरु केली आहे. यामध्ये २५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतात.

Siddhi Hande

राजस्थान सरकारची खास योजना

२५ लाखांपर्यंत कॅशलेस योजना

कॅन्सर, लिव्हरच्या आजारावर मोफत औषधे

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील काही योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. काही योजनांमध्ये त्यांना आरोग्यसंबंधित अडचणींसाठी मदत केली जाते. अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेत नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. याचसोबत राजस्थान सरकारनेही एक योजना सुरु केली आहे.

केंद्र सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर इतर अनेक राज्य सरकारने आरोग्यसंबंधित अनेक योजना राबवल्या आहेत. राजस्थान सरकारने आयुष्मान आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री निशुल्क निरोगी राजस्थान योजना, राजस्थान सरकारी हेल्थ स्कीम सुरु केली आहे. या योजनेत मोफत चेकअप केले जाते.

राज्य सरकारद्वारे चालवलेली मुख्यमंत्री आरोग्य योजना लोकप्रिय आहे. यामध्ये ३६ लाख कुटुंबांना सुरक्षा दिली जाते.या योजनेत २५ लाख कॅशलेस व्यव्हार करु शकतात. यामध्ये प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायजेशनचा खर्चांचा समावेश आहे. यामध्ये तुम्हाला कॅशलेस उपचार आणि औषधे मोफत मिळणार आहे. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राजस्थान सरकारने ही योजना सुरु केली होती.या योजनेत https://rajswasthya.rajasthan.gov.in/ वर जाऊन अर्ज करु शकतात.

राजस्थान सरकारद्वारे कॅन्सर, लिव्हरसंबंधित आजारासाठी मोफत औषधे दिली जातात. गेल्या १५ वर्षांपासून ही योजना सुरु आहे. यामध्ये १६३ कोटींपेक्षा जास्त रुग्णांना लाभ दिला आहे. याचसोबत फ्रीमध्ये एक्स रे, एमआरआय आणि लॅब टेस्ट केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पणजी- वेंगुर्ला बसचा आजगावमध्ये अपघात; प्रवाशी सुरक्षित

Heart Attack : फक्त हाय BP अन् लठ्ठपणा नाही! 'या' कारणांमुळेही येतो हार्ट अटॅक

Gold Rate Today : खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ₹१६९० ने स्वस्त, जाणून घ्या 22k आणि 24k चा भाव

कंबरेपर्यंत केस वाढवण्यासाठी महिलांनी करा ५ सोपे उपाय

Heart blockage: हार्टमध्ये स्टेंट कधी लावावा लागतो? हार्ट ब्लॉकेजबद्दल डॉक्टरांनी दिली संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT