December Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! RBI ने जाहीर केली यादी

RBI Bank Holiday Calendar 2026 : डिसेंबर २०२६ मध्ये बँकांना अनेक असतील. रविवार, शनिवार, ख्रिसमस आणि स्थानिक सणांमुळे बँका बंद राहतील.
December Bank Holiday List
Decembersaam tv
Published On: 

२०२६ या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहीलेत. डिसेंबरमध्ये तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं करायली असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण डिसेंबर महिन्यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार तसेच ख्रिसमस आणि काही राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकेच्या शाखेत जाण्याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) हॉलिडे कॅलेंडर तपासणं महत्त्वाचं आहे.

डिसेंबरमध्ये किती दिवस बँका बंद राहणार?

डिसेंबर २०२६ मध्ये देशातल्या बँकांना नियमित साप्ताहिक सुट्ट्या असतील. ६, १३, २० आणि २७ डिसेंबर रोजी रविवारी असेल म्हणून बँका बंद राहतील. तसेच १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि २६ डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांच्या शाखांमध्ये कामकाज होणार नाही. २५ डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त देशभर बँकांना सुट्टी असेल. तसेच काही राज्यांमध्ये स्थानिक सण आणि विशेष दिवसांमुळे जास्तीच्या सुट्ट्या असतील.

December Bank Holiday List
Duplicate Ration Card : रेशन कार्ड हरवलं किंवा फाटलं? काळजी नको! घरबसल्या मोबाईलवरून काढा दुसरं कार्ड

सिक्कीम आणि मेघालयमध्ये सर्वाधिक सुट्ट्या

डिसेंबरमध्ये सिक्कीम आणि मेघालय मधल्या बँकांना सुट्ट्यांचं नियोजन करूनच कामं करावी लागतील. सिक्कीममध्ये ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी लोसूंग आणि नामसूंग उत्सवामुळे बँका बंद राहतील. तर मेघालयमध्ये १८ डिसेंबरला यू सोसो थाम पुण्यतिथी, २४ डिसेंबरला ख्रिसमस ईव्ह आणि ३० डिसेंबरला यू कियांग नांगबाह पुण्यातिथी असल्यामुळे सुट्टी असेल.

December Bank Holiday List
EPFO UPI Withdrawal : PF चे पैसे काढण्यासाठी क्लेमची झंझट संपणार? डिसेंबरमध्ये येतेय नवी सुविधा

तसेच १ डिसेंबरला अरुणाचल प्रदेश, ३ डिसेंबरला गोवा, १९ डिसेंबरला गोवा, २४ डिसेंबरला मिझोराम, नागालँड आणि मेघालय, तर ३१ डिसेंबरला मिझोराममध्ये बँका बंद राहतील.

बँका बंद असल्या तरी ऑनलाइन व्यवहार सुरू

बँकांच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांची ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील. UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि ATM च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येतील. तसेच NEFT आणि RTGS सुविधांचाही ऑनलाइन वापर करता येईल.

त्यामुळे चेक क्लिअरन्स, केवायसी, डिमांड ड्राफ्ट किंवा इतर महत्त्वाची कामं असतील तर ती सुट्ट्यांआधी पूर्ण करा. महत्त्वाचं म्हणजे, बँकांच्या सु्ट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या शहरातल्या आणि बँकेच्या शाखेतल्या सुट्टीची माहिती अधिकृत RBI हॉलिडे कॅलेंडरवर तपासूनच बँकेत जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.