Duplicate Ration Card : रेशन कार्ड हरवलं किंवा फाटलं? काळजी नको! घरबसल्या मोबाईलवरून काढा दुसरं कार्ड

How to Apply for Duplicate Ration Card : रेशन कार्ड हरवलं असेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने डुप्लिकेट रेशन कार्ड तयार करू शकता.
Duplicate Ration Card
Duplicate Ration Cardsaam tv
Published On: 

मुलांच्या शाळेच्या प्रवेशापासून ते रेशन घेण्यापर्यंत रेशनकार्ड हा महत्त्वाचा पुरावा लागतो. बऱ्याचदा कागदपत्रे आपण महत्त्वाच्या कामासाठी बाहेर घेऊन जातो आणि ती आणायला विसरतो म्हणजेच ती कुठेतरी हरवतात. काहीवेळेस रेशनकार्ड असो किंवा इतर महत्त्वाचा पुरावा वापरून वापरून तो जूना होतो किंवा फाटला जातो.

त्यामुळे पुढील कामं रखडली जाऊ शकतात. पण तुम्ही यावर उपाय म्हणून डुप्लिकेट रेशन कार्ड तयार करू शकता. त्याच्या वापर महत्त्वाच्या कामासाठी करू शकता. याची प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करू शकता.

Duplicate Ration Card
EPFO UPI Withdrawal : PF चे पैसे काढण्यासाठी क्लेमची झंझट संपणार? डिसेंबरमध्ये येतेय नवी सुविधा

सर्वात आधी रेशन कार्ड हरवलं असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. यासाठी एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं. मग तुम्ही ऑफलाइन पद्धतीने तुमच्या जिल्ह्यातल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जा. तिथे डुप्लिकेट रेशनकार्डासाठी अर्ज करा. हा फॉर्म अचूक भरून तिथे नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे भरा. त्यामध्ये एफआयआरची प्रत सुद्धा द्यावी लागते. तिथे तुम्हाला नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरावे लागेल. अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांमध्ये नवीन रेशन कार्ड तयार होईल. ते तुम्ही संबंधित कार्यालयातून मिळवू शकता.

Duplicate Ration Card
Gig Workers : ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! डिसेंबरपासून मिळणार पेन्शन अन् विम्याचा लाभ? A टू Z माहिती वाचा

तुम्ही ऑनलाइन डुप्लिकेट रेशनकार्ड काढू शकता. त्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डुप्लिकेट रेशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला त्यावर डिजिटल ई-रेशन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करून वापरता येईल. तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी हे कार्ड वापरू शकता. यासाठी जास्त दिवसांचा कालावधी जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.