Gig Workers : ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! डिसेंबरपासून मिळणार पेन्शन अन् विम्याचा लाभ? A टू Z माहिती वाचा

Gig Workers Pension Scheme : केंद्र सरकार गिग वर्कर्ससाठी डिसेंबरअखेर पेन्शन, आरोग्य विमा आणि इतर सुविधा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
Gig Workers
Gig Workerssaam tv
Published On: 

देशातल्या गिग आणि प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या शेवटी या कामागारांसाठी पेन्शन योजना, आरोग्य विमा, मातृत्व लाभ आणि अपंगत्व संरक्षण यांसारख्या सामाजिक सुरक्षा सुविधा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याचा देशातल्या जवळपास १५ लाख गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना फायदा होईल.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना प्राधान्य

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना या योजनांचे प्राथमिक लाभार्थी मानले जातील. तसेच प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या माध्यमातून या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना पेन्शनसोबत इतर सामाजिक सुरक्षा सुविधांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोस्ताहन मिळण्याची अपेक्षा आहे.

Gig Workers
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांच्या पगारात १५,४०० रुपयांची वाढ, थकबाकी किती मिळेल?

कंपन्यांना २ टक्के योगदान द्यावे लागू शकते

तर या सामाजिक सुरक्षा निधीसाठी कंपन्यांकडून आर्थिक योगदान घेण्याचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. यामध्ये दोन मॉडेलवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पहिल्या मॉडेलनुसार, प्लॅटफॉर्म कंपन्यांना त्यांच्या एकूण उलाढालीच्या (Turnover) जवळपास २ टक्के रक्कम सामाजिक सुरक्षा निधीत जमा करावी लागू शकते. तर दुसऱ्या मॉडेलनुसार, प्रत्येक व्यवहाराच्या मूल्याच्या सुमारे २ टक्के योगदान देण्याचा पर्याय आहे.

स्विगी, झोमॅटो, उबरसह कंपन्यांचा समावेश

स्विगी, झोमॅटो, उबर, ओला, रॅपिडो, प्रोंटो, स्नॅबिट आणि अर्बन कंपनी अशा मोठ्या प्लॅटफॉर्मशी संबंधित कामगारांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. या कंपन्यांनी आपल्या कामगारांची माहिती सरकारसोबत शेअर केल्याची सुत्रांना बातमी मिळाली आहे.

Gig Workers
Budget 2027: पगार ४२ हजार अन् ग्रॅच्युइटी ४० लाख! बजेट २०२७ मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट?

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळात होणार चर्चा

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाच्या (NSSB) आगामी बैठकीत या योगदान मॉडेलवर चर्चा होईल अशी शक्यता आहे. ही बैठक पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होऊ शकते. नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे अध्यक्ष आणि मंडळाचे सदस्य दीपक जैस्वाल यांनी सरकारने या निधीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद केली पाहिजे, अशी सूचना केली आहे. सोबतच कंपन्यांनी योगदानाचा आर्थिक भार कामगारांवर टाकू नये. त्यांच्या प्रोत्साहन रकमेवर किंवा प्रत्येक ऑर्डरच्या मोबदल्यावर परिणाम होऊ नये, याची काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.