Blood Thinner: रक्त पातळ करणारी औषधे घेताय? सावधान! होऊ शकतो गंभीर रक्तस्त्राव; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Medical Warning: रक्त पातळ करणारी औषधं घेतल्याने 'घातक रक्तस्त्राव' होऊ शकतो, असा इशारा ३० वर्षांचा अनुभव असलेले हृदयरोगतज्ज्ञ देतात.
Anticoagulant Drug Warning
Blood Thinner Side Effectsgoogle
Published On

फेब्रुवारी हा महिना थंडीचा असतो. पण जानेवारी इतकी थंडी या दिवसात लागत नाहीत. अनेकांना या दिवसात बिछाना सोडून उठण्याची इच्छाच नसते. उष्ण वातावरणात लोक आराम करणं पसंत करतात. पण काहींना कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं. कारण सगळ्यांच्याच पोटापाण्याचा प्रश्न असतो. बऱ्याचदा या दिवसात सर्दी-खोकल्यासोबत काही जीवघेण्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. त्यातली एक समस्या म्हणजे रक्त गोठणे.

रक्त गोठणं म्हणजे जवळपास मृत्यूला आमंत्रण देणं. म्हणूनच अनेक जण या समस्येवर उपचार घेतात. त्यावेळेस घेतलेली औषधं बऱ्याचदा उलट परिणाम सुद्धा करु शकतात. अमेरिकेतील तज्ज्ञांच्या मते, माउंट सायनाय हॉस्पिटलचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ यांना 30 वर्षांहून जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, औषधं नेहमीच चुकीची नसतात, तर उपचारांची योजना चुकीची असते.

Anticoagulant Drug Warning
High Cholesterol: कोलेस्टेरॉल वाढण्याच्या महिनाभरआधी दिसतात ही 5 गंभीर लक्षणं, वेळीच व्हा सावध अन्यथा पडेल महागात

डॉ. लेविन यांच्या म्हणण्यानुसार सध्या अनेक रुग्णांमध्ये रक्तस्रावाच्या घटना वाढताना दिसतायेत. याचं कारण औषधांचा चुकीचा डोस नाही तर तुमचा निष्काळजीपणा आहे. तज्ज्ञांच्या मते, गरज नसताना घेतली जाणारी ॲस्पिरिन आणि काही नैसर्गिक सप्लिमेंट्स कारणीभूत ठरत आहेत. अनेकदा रुग्णांचं वय, वजन किंवा किडनीची कार्यक्षमता लक्षात न घेता एकाच प्रमाणात औषध दिलं जातं. त्यामुळे रुग्ण नकळत रोज जास्त प्रमाणात औषध घेतात आणि रक्तस्रावाचा धोका वाढतो.

काही हृदयाशी संबंधित औषधं रक्त पातळ करणाऱ्या औषधांचे प्रमाण शरीरात वाढवतात. त्याने औषधाचा परिणाम तीव्र होऊन अंतर्गत रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. अनेक रुग्ण स्टेंट बसवल्यानंतर वर्षानुवर्ष ॲस्पिरिन घेत राहतात आणि त्याच वेळी ब्लड थिनरही सुरू असतो.

इतकंच नाही तर ‘नैसर्गिक’ म्हणून ओळखली जाणारी काही सप्लिमेंट्स किंवा गोळ्या विशेषतः जास्त प्रमाणातले फिशींग ऑइल, यांनाही रक्त पातळ करण्याचा गुणधर्म असतो. ही सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लड थिनर्ससोबत घेतल्यामुळे संरक्षणाऐवजी रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या रुग्णांनी कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Anticoagulant Drug Warning
Jio Offer: खुशखबर! Jioच्या ग्राहकांना फक्त 49 रुपयांत मिळणार 'या' विशेष सवलती, हा प्लान एकदा पाहाच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com