Railway Recruitment Saam tv
बिझनेस

Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी, ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

रेल्वेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.रेल्वेने १०वी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वेत सध्या ४००० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदांसाठी भरती होणार आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने नॉर्दर्न रेल्वेसाठी भरती जाहीर केली आहे. ४११६ पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी रेल्वे विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी रेल्वेच्या rrcnr.org वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

आरआरसी नॉर्दनमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे तुमच्याकडे १ महिन्याचा वेळ आहे.

पात्रता

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत नॅशनल काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग येथून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना तुमच्याकडे १०वी आणि आयटीआयचा निकाल असणे गरजेचे आहे.

परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना १० वर्षांची सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यायची नाही. परीक्षेशिवाय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने विविध विभागांमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड १०वीतील गुणांच्या आधारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला RRC NR च्या अधिकृत वेबसाइटवर rrcnr.org जायचे आहे.

यानंतर Apply Online for Act Apprentices 2025 लिंकवर क्लिक करा.

यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल टाकून रजिस्ट्रेशन करावे.

यानंतर तुम्हाला लॉग इन करुन अर्ज करायचा आहे.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरुन अर्ज सादर करायचा आहे. यानंकर शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO News: काही मिनिटांत काढा पीएफ; त्याआधी हे काम कराच; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये राडा, Live शो मध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल

Sara Arjun: रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटात झळकणारी सारा अर्जुनचा ग्लॅमर लूक व्हायरल, पाहा PHOTO

तिसऱ्या मजल्यावर गेली अन् ८वीत शिकणाऱ्या आरोहीनं उडी मारली; रक्ताच्या थारोळ्यात लेकीला पाहून वडिलांना धक्का | Jalna

SCROLL FOR NEXT