Government Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी; २९० पदांसाठी भरती; पगार मिळणार १,७७,५००; आजच करा अर्ज

Maharashtra Jeevan Pardhikaran Bharti 202: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. २९० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
Government Job
Government JobSaam Tv
Published On
Summary

सरकारी विभागात नोकरीची संधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी

२९० पदांसाठी भरती

सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र शासनाने सध्या भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. अ, ब आणि क संवर्गातील पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये एकूण २९० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Government Job
MSRTC Jobs : एसटी महामंडळात मोठी भरती, तब्बल १७४५० जागा भरणार, पगार ३० हजारांच्या पुढे

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात लेखा परिक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारीस उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक/लिपिक नि टंकलेखक अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२५ आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. लेखा परीक्षण अधिकारी पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा, लेखा अधिकारी (गट ब)पदांसाठी कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असावा.सहाय्यक लेखा अधिकारी (गट ब) पदासाठीही डिग्री प्राप्क प्राप्त केलेली असावी. अभियंता पदासाठी संबंधित विषयात इंजिनियरिंग केलेले असावे.

Government Job
WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

पगार (Salary)

या नोकरीसाठी निवड झाल्यावर पदानुसार पगार वेगवेगळा मिळणार आहे. लेखा परीक्षण अधिकारी (गट अ) पदासाठी ५६१०० ते १७७५०० रुपये पगार मिळणार आहे. लेखा अधिकारी गट ब पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये मिळणार आहे. सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी ३८,६०० ते १,२२८०० रुपये पगार मिळणार आहे.पगार हा पदानुसार वेगवेगळा असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १९ डिसेंबरपूर्वी अर्ज करायचे आहेत.

Government Job
Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com