अंधेरी रेल्वे स्थानकावर वृद्ध व्यक्तीकडून मुलीचं धर्मांतर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पोलिस म्हणाले...

Andheri Station Controversy: अंधेरी रेल्वे स्थानकात एक वृद्ध व्यक्ती तरुणीचे धर्मांतरण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, हा धर्मांतराचा प्रकार नसून जपानी मेडिटेशनचा एक प्रकार असल्याचं समोर आलं आहे.
Andheri Station Controversy
Andheri Station ControversySaam
Published On
Summary
  • अंधेरी रेल्वे स्थानकाचा व्हिडिओ व्हायरल

  • वयस्कर व्यक्ती मुलीचा धर्मांतर करत असल्याचा आरोप

  • पोलीस तपासातून वेगळीच माहिती समोर

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरील एका व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली होती. ज्येष्ठ व्यक्ती भरदिवसा स्टेशनवर एका मुलीचं धर्मांतर करत असल्याचा आरोप काही जणांनी केला. याचा व्हिडिओही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे वातावरण देखील तापले होते. 'अंधेरी स्टेशन लव्ह जिहाद अन् धर्मांतराचा नवा अड्डा झालाय', असं काहींनी म्हटलं आहे. या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस तपास करण्यात आला. पोलीस तपासात आरोप आणि दावे खोटे असल्याचं समोर आलंय.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय होतं?

व्हायरल व्हिडिओ अंधेरी रेल्वे स्टेशनचा असल्याचं समोर आलं आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनवर एक मुलगी बसलेली असते. तिच्या समोर एक वृद्ध पुरूष उभा आहे. मुलगी हात जोडून आणि डोळे मिटून बसली आहे. तर, वयस्कर व्यक्ती मंत्रसदृश्य उच्चार करत असल्याचं दिसून येत आहे. यानंतर काही जणांनी त्या व्यक्तीला जाब विचारला. तसेच काही प्रश्न विचारले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Andheri Station Controversy
एकच नंबर! लग्नसराईत सोनं- चांदीच्या दरात घसरण, १ तोळं सोन्याचा आजचा भाव किती?

व्हिडिओ व्हायरल होताच अंधेरी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. व्हायरल व्हिडिओमधील दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात आला. तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्या दोघांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबात मुलीनं धक्कादायक माहिती दिली.

Andheri Station Controversy
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? नेमकं कारण काय? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

वयस्कर व्यक्तीकडून धर्मांतर करण्यात आला नसून, जपानी मेडिटेशनचा प्रकार असल्याचं संबंधित मुलीकडून सांगण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे दोन्हीही व्यक्ती हिंदूधर्मीय आहेत. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांकडून चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, असं मुलगी आणि वृद्ध व्यक्तीने सांगितलं. ते दोघेही एकमेकांचे परिचयाचे आहेत. संबंधित व्हिडिओ डिलीट करण्यासाठी मुलीने पोलिसांकडे विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com