Bank Jobs: महत्त्वाची बातमी! जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य; ७० टक्के जागा राखीव

District Central Co Operative Bank Recruitment: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बँकेत जिल्ह्यातील तरुणांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Bank Jobs
Bank JobsSaam Tv
Published On
Summary

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरतीसाठी जिल्ह्यातीस तरुणांसाठी राखीव जागा

जिल्ह्यातील तरुणांसाठी ७० टक्के राखीव जागा

बँकेत नोकरी करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न आहे. बँकेत दरवर्षी विविध पदांसाठी भरती निघते. जिल्हा बँकांमध्येही वर्षभरात विविध पदांसाठी भरती जाहीर होते. दरम्यान, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील भरती अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Bank Jobs
Bank Of Baroda Jobs: ७वी आणि १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; बँक ऑफ बडोदामध्ये भरती सुरु; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

आता यापुढे जिल्हा बँकांमधील भरतीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात बँकेत काम करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. यामुळे तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे.

जिल्हा बँकेतील नोकरीसाठी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून उमेदवार अर्ज करु शकत होता. दरम्यान, आता यामधील ७० टक्के जागा जिल्ह्यातील तरुणांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्हा बँकांमध्ये सभासद हे जिल्ह्यातील नागरिक असतात. त्यामुळे नोकरभरतीमध्ये स्थानिकांना प्रधान्य द्यावे, अशी मागणी केली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही मागणी सभासदांनी केली होती.

Bank Jobs
Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत येत्या काही दिवसात लेखनिक, शिपाई, वाहनचालक पदांसाठी भरती केली जाणार आहे. १०८० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ही भरती करताना पुणे जिल्ह्यातील मुलांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी जास्ती जास्त अर्ज करायचे आहे. ही भरती शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रधान्य देणारी असणार आहे.शक्य असल्यास मदत करु, असं अजित पवारांनी आश्वासन दिले आहे.

Bank Jobs
Bank Holidays : नोव्हेंबरमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद, डिजिटल सेवा मात्र २४ तास सुरू राहणार | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com