

दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया देशात सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जात आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या या आंदोलनांमध्ये देशातील मुख्य विरोधी पक्षाने आतापर्यंत ७०० लोकांचा बळी घेतलाय. दरम्यान हिंसाचार दडपण्यासाठी सरकारने इंटरनेट पूर्णपणे बंद केलंय, परंतु हजारो नागरिक अजूनही रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन यांनी त्यांच्या मुख्य विरोधकांना तुरुंगात टाकले आहे. तर काही विरोधकांना सार्वत्रिक निवडणूक लढवण्यास बंदी घातलीय, ज्यामुळे मतदानादरम्यान अराजकता निर्माण झालीय.दार एस सलाम आणि इतर शहरांच्या रस्त्यावर जमाव उतरलाय. नागरिकांनी राष्ट्रपतींचे पोस्टर फाडले आणि पोलीस आणि मतदान केंद्रांवर हल्ला केला, ज्यामुळे इंटरनेट बंद झाले आणि कर्फ्यू लागू करण्यात आलाय.
देशात विदेशी पत्रकारांनाही निवडणुकीचे वार्तांकन करण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे जमिनीवरील अचूक माहिती मिळवणे कठीण झाले होते. विरोधी पक्षनेते चाडेमा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा हवाला देत शुक्रवारी सांगितले की, अनेक व्यावसायिक केंद्रांमध्ये आणि रस्त्यावर आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरू आहे.
आतापर्यंत, दार एस सलाममध्ये मृतांची संख्या सुमारे ३५० आहे आणि मवांझामध्ये २०० पेक्षा जास्त आहे, देशभरातील इतर ठिकाणांवरील आकडेवारीचा समावेश केली तर एकूण संख्या सुमारे ७०० आहे. "दरम्यान मृतांची संख्या खूप जास्त असू शकते. तसेच रात्रीच्या कर्फ्यू दरम्यानही हत्या होऊ शकतात, अशी भीती चाडेमाचे प्रवक्ते जॉन किटोका यांनी व्यक्त केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.