Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: दर महिन्याला ५००० रुपये गुंतवा अन् ८ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही दर महिन्याला ५००० रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर भविष्यात कधीच आर्थिक अडचण भासणार नाही. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही जर ८ लाख रुपये जमा करु शकतात. (Post Office Recurring Deposit Scheme)

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला दर महिन्याला फक्त ५००० रुपये गुंतवायचे आहे. ५००० रुपये गुंतवून तुम्ही ८ लाख रुपये जमा करु शकतात. या योजनेच्या आधारावर तुम्हाला लोनदेखील मिळू शकते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याजदर मिळते. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीमवर सरकार दर तीन महिन्यांनी संशोधन करते. त्यानंतर व्याजदर ठरवते. या योजनेत तुमच्या गुंतवणूकीवर चक्रवाढ व्याजदेखील लागते. (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही दर महिन्याला ५००० रुपयांची गुंतवणूक करा. त्यानंतर तुम्ही मॅच्युरिटी पीरियडपर्यंत ३ लाख रुपये जमा कराल. यावर ६.७ टक्के व्याजदर द्यावे लागते. त्यामुळे ५६,८३० रुपये व्याज तुम्हाला मिळेल. पाच वर्षात तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळतात.

पाच वर्षात रिकरिंग डिपॉझिट योजनेत १० वर्षांसाठी ६ लाख रुपये गुंतवू शकतात.यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये मिळणार आहे. त्यानंतर १० वर्षात ८,५४,२७२ रुपये जमा होणार आहे.

तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात. यामध्ये तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पाच वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड आहे. त्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT